Imran Khan: फैसले की घडी! पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय आज रात्री 8 वाजता ‘निक्काल’ लावणार; इम्रान खान यांचे काय होणार?
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यासाठी आज फैसले की घडी ठरणार आहे. पाकिस्तानच्या (pakistan) नॅशनल असेंबलीत (national assembly) विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला होता.
लाहोर: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यासाठी आज फैसले की घडी ठरणार आहे. पाकिस्तानच्या (pakistan) नॅशनल असेंबलीत (national assembly) विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला होता. असेंबलीच्या उपाध्यक्षांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर गेली तीन दिवस सुनावणी सुरू होती. आज ही सुनावणी पूर्ण झाली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उमर अता बंदियाल हे आज रात्री 8 वाजता या प्रकरणावर निकाल देणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. न्यायालय इम्रान खान यांच्या बाजूने निर्णय देते की विरोधकांच्या हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवाय पाकिस्तानात निवडणुका होणार की नाही हे सुद्धा आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
पाकिस्तानातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली आहे. आज त्यावर निर्णय होणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींच्या पत्राला उत्तर दिलं आहे. ऑक्टोबर 2022मध्ये निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग तयार आहे. संविधान आणि कायद्यानुसार परिसीमन करण्यासाठी चार महिने लागणार आहेत, असं निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना कळवलं आहे. त्यानंतर सर्व साधारण निवडणुकीसाठी महत्त्वाची चर्चा करण्यासाठी राष्ट्रपतींकडे बैठक घ्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.
कोर्टात याचिका कशासाठी?
नॅशनल असेंबलीच्या उपाध्यक्षांनी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला होता. हा अविश्वास ठराव पाकिस्तानच्या संविधानाच्या विरोधात असल्याचं उपाध्यक्षांनी म्हटलं होतं. या निर्णयाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानची संसद बरखास्त करण्यात आली होती आणि 90 दिवसाच्या आत निवडणूक घेण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
कोर्टात काय घडलं?
- पहिल्या दिवसापासूनच निवडणुका व्हाव्यात ही विरोधकांची इच्छा आहे, असं जस्टिस जमाल मंडोखेल यांनी म्हटलं. त्यावर विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ म्हणाले की, प्रश्न संविधानाचा भंग करण्याचा आहे. त्यावर, मंडोखेल म्हणाले की, असे असेल तर आम्ही संविधानाची डागडुजी करू.
- हे संपूर्ण प्रकरण जनहिताशी संबंधित आहे. पाकिस्तानाच्या राजकारणावर मी काहीच प्रतिक्रिया देणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीशांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अॅटर्नी जनरल यांना काही सवाल केले. 2013च्या निवडणुकीत तुमच्याकडे किती जागा होत्या. ज्या पक्षाला बहुमत मिळतं, त्याच पक्षाचा फायदा असतो.
- यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमर अता बंदियाल म्हणाले की, एक गोष्ट स्पष्ट आहे, रोलिंग चुकीची आहे. त्यावर आम्ही रोलिंगचं समर्थन करत नाहीये. मी राष्ट्री सुरक्षा समितीला याबाबतची माहिती देण्यास तयार असल्याचं अॅटर्नी जनरल यांनी सांगितलं.
- पंतप्रधानांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणअयाचा अधिकार संविधानानेच दिला आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं. स्पीकर सभागृहाचा केअर टेकर आहे. केवळ व्यक्तिगत समाधानासाठी ते बसून राहू शकत नाहीत. ते आपलं खासगी मत नोंदवून इतर सदस्यांना गुडबाय म्हणू शकत नाहीत, असं न्यायाधीश मुनीब अख्तर यांनी सांगितलं. उपाध्यक्षांनी त्यांचं काम योग्य पद्धतीने केलं नाही. त्यांचा निर्णय चुकीचा होता, असं निरीक्षणही मुनीब अख्तर यांनी नोंदवलं.
- त्यावर अॅटर्नी जनरल यांनी सरकारची बाजू मांडली. अविश्वास प्रस्तावावर मतदान करणं हा संसद सदस्यांचा मौलिक अधिकार नाहीये. मतदानाचा अधिकार संविधान आणि विधानसभा नियमात येतो. स्पीकरने एखाद्या सदस्याला निलंबित केलं तर तो कोर्टातून आपलं निलंबन रद्द करू शकत नाही, असं अॅटर्नी जनरल यांनी स्पष्ट केलं.
Supreme Court of Pakistan remarks that Deputy Speaker National Assembly’s ruling was wrong over no-trust vote against the then PM Imran Khan: Pakistan media
— ANI (@ANI) April 7, 2022
संबंधित बातम्या:
पाकिस्तानात संवैधानिक पेच, इम्रान काळजीवाहू पंतप्रधान, जाणून घ्या पाकिस्तानात नेमकं काय घडतंय