पाकिस्तानची एअर स्ट्राईक, आठ जणांचा मृत्यूनंतर तालिबानची परिणाम भोगण्याची धमकी
pakistan air strike on afghanistan: पाकिस्तानी लष्कराकडून एअर स्ट्राईक झाल्याच्या बातमीला अफगाणिस्तानच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. अफगाणिनी प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्री तीनच्या सुमारास पाकिस्तानी विमानांनी खोस्त प्रांतात बॉम्बफेक केली. या हल्ल्यात 3 महिला आणि 3 लहान मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
कराची | 19 मार्च 2024 : पाकिस्तानच्या नव्या सरकारने अफगाणिस्तानमध्ये एअर स्टाईक केली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी पाकिस्तानने केलेल्या अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या कृतीमुळे तालिबान संतप्त झाले असून त्याचे वाईट परिणाम होतील.
कमांडर ठार झाल्याचा दावा
पाकिस्तानी सेनेने अफगाणिस्तानमधील सीमांमध्ये घसून खोस्त आणि पक्तितामध्ये दोन वेगवगेगळ्या ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यात तहरीक ए तालिबानचा कमांडर अब्दुल्ला शाह याचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. त्यानंतर टीटीपीच्या कमांडरने व्हिडिओ प्रसिद्ध करत पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, आम्ही दक्षिण वझिरीस्तानमध्ये असून आमच्या नियमित कारवाया सुरूच आहेत.
अफगाणिस्तानकडून दुजोरा
पाकिस्तानी लष्कराकडून एअर स्ट्राईक झाल्याच्या बातमीला अफगाणिस्तानच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. अफगाणिनी प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्री तीनच्या सुमारास पाकिस्तानी विमानांनी खोस्त प्रांतात बॉम्बफेक केली. या हल्ल्यात 3 महिला आणि 3 लहान मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
तालिबानने दिली धमकी
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तानने महिला आणि मुलांना लक्ष्य केले आहे. जबिउल्लाह म्हणाले, ‘तालिबान सरकार अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून कोणालाही सुरक्षेशी खेळू देणार नाही. पाकिस्तानने सीमेचे उल्लंघन करुन घोडचूक केली आहे. आम्ही आमच्या हद्दीत कोणालाही घुसू देणार नाही. पाकिस्तानच्या नव्या सरकारने युद्धाच्या दिशेने जाऊ नये. त्यांनी आपल्या देशातील अंतर्गत बाबींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे जबिउल्लाह यांनी म्हटले आहे.
काही लष्करी अधिकाऱ्यांच्या कृतींमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडू नयेत. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे कोणतेही उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे तालिबाने म्हटले आहे.