G20 मधील भारतीय पंतप्रधानांच्या शैलीने पाकिस्तानी तज्ञ प्रभावित, शाहबाज यांचा फटकारले

56 वर्षात कॅरेबियन देश गयानाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी १९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तेथे गेल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी गयानाला पोहोचले.

G20 मधील भारतीय पंतप्रधानांच्या शैलीने पाकिस्तानी तज्ञ प्रभावित, शाहबाज यांचा फटकारले
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 12:59 AM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19व्या G-20 शिखर परिषदेेला हजेरी लावली. G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, इटली, इंडोनेशिया, नॉर्वे, पोर्तुगाल, इजिप्त, दक्षिण कोरिया आणि इतर देशांच्या नेत्यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांनी आयएमएफच्या गीता गोपीनाथ आणि युरोपियन युनियनच्या उर्सुला वॉन डेर लेयन यांचीही भेट घेतली. याबाबत पाकिस्तानचे राजकीय समालोचक कमर चीमा यांनी नरेंद्र मोदी यांच्या जागतिक नेत्यांसोबतच्या त्यांच्या भेटीगाठींबाबत कौतुक केले. एकीकडे चीमा यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारला कोंडीत पकडले.

कमर चीमा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले की, ‘ब्राझीलची जी-20 शिखर परिषद नरेंद्र मोदी यांचं जगात काय स्थान आहे हे दिसून येत आहे. G-20 च्या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे स्थान दिले होते. मोदींच्या एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तर दुसऱ्या बाजूला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होते. मोदींनी यावेळी इटली आणि इतर देशांच्या नेत्यांचीही भेट घेतली. यावरून भारताला जगात स्थान प्राप्त झालंय हे दिसून येतंय. भारतासोबत आम्ही (पाकिस्तान)ही स्वातंत्र्य मिळवले पण आज आम्ही कुठे आहोत हे आम्हाला ही माहित नाही. आज जगात आपण कुठेच दिसत नाही.’

नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना कमर चीमा म्हणाले की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका, ब्राझील, इटलीच्या नेत्यांना भेटत आहेत जणू ते ब्राझीलमध्ये एखाद्या गुजराती भाषिक व्यक्तीला भेटले आहेत आणि तिथं धमाल सुरू आहे. नरेंद्र मोदींनी आपले पत्ते अतिशय सुंदरपणे खेळले आहेत आणि संपूर्ण नियोजन करून जगासमोर ते सादर केले आहे, असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदींनी आपले पत्ते चमकदारपणे खेळले आणि त्याचा परिणाम म्हणजे नरेंद्र मोदी आणि भारताला जगात एक मोठे स्थान मिळत आहे.

पाकिस्तानच्या स्थितीबद्दल चीमा पुढे म्हणाले की, भारत किंवा जगाच्या तुलनेत आपण कुठे मागे आहोत यावर चर्चा व्हायला हवी. चीमा म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये कधीच टॅलेंटची कमतरता नव्हती पण आम्हाला ते समजले नाही. आम्ही राज्यघटनेला महत्त्व दिले नाही, जनादेश पुन्हा पुन्हा चोरला, उच्चभ्रूंना सर्व काही काबीज करू दिले आणि परराष्ट्र धोरण कधीच स्पष्ट केले नाही. दुसरीकडे, भारताने स्वातंत्र्यापासूनच परराष्ट्र धोरण ठरवले आहे आणि त्यावर पुढे जाणे पसंत केले आहे. जनतेच्या मताला आणि जनादेशाला महत्त्व दिले आणि जनतेचा आदर केला. याचाच परिणाम म्हणजे आज भारत एक चांगले ठिकाण बनले आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.