Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात पेट्रोल इतके महागले की गाढवावर बसून ऑफिसला जाण्याची वेळ, पीकअप- ड्रॉप सर्व्हिस ठप्प,

देशात एवढी महागाई वाढलेली असताना एयरपोर्ट एथॉरिटीने पीक अप आणि ड्रॉपची सुविधा बंद केली आहे. पेट्रोल भत्ताही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता गाढवावर येण्यावाचून पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एयरपोर्टवर गाढव बांधण्याची परवानगीही त्यांनी या पत्रात मागितली आहे.

पाकिस्तानात पेट्रोल इतके महागले की गाढवावर बसून ऑफिसला जाण्याची वेळ, पीकअप- ड्रॉप सर्व्हिस ठप्प,
Pakistan Petrol HikeImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 3:00 PM

इस्लामाबाद – पाकिस्तानातील (Pakistan)वाढलेल्या पेट्रोलच्या दरामुळे (Petrol Hike)नागरिक हैराण झालेत, अशा स्थितीत इस्लामाबाद एयरपोर्टवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पाकिस्तानील सिव्हिल एव्हिएशव अथोरिटीकडे अजब मागणी केली आहे. पेट्रोलचे भाव परव़डत नसल्याने गाढवावर बसून ऑफिसला (permission for Donkey)यायची परवानगी मिळावी, अशी मागणी या कर्मचाऱ्याने केली आहे. या कर्मचाऱ्याने डीजी सीएए यांना दिलेले पत्रच समोर आले आहे. यात पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आपली गाडी घेऊन ऑफिसला येणे शक्य नसल्याचे या कर्मचाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे एका गाढवनाला ऑफिसला आणण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

असिफ इक्बाल यांनी लिहिले पत्र

हे पत्र असिफ इक्बाल या कर्मचाऱ्याने लिहिले आहे. देशात एवढी महागाई वाढलेली असताना एयरपोर्ट एथॉरिटीने पीक अप आणि ड्रॉपची सुविधा बंद केली आहे. पेट्रोल भत्ताही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता गाढवावर येण्यावाचून पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एयरपोर्टवर गाढव बांधण्याची परवानगीही त्यांनी या पत्रात मागितली आहे.

हा मीडिया स्टंट, कंपनीचा दावा

कर्मचाऱ्याची ही मागणी हा मीडिया स्टंट असल्याचा दावा सीएएच्या प्रवक्त्यांनी केला आहे. गाढव आणण्यापेक्षा इस्लामाबाद रावळपिंडी मेट्रोचा वापर करावा, असेही या पवक्त्याने सुचविले आहे. माध्यमांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आल्याचे प्रवक्त्याचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

एका महिन्यात ६० रुपयांनी पेट्रोल महागले

पाकिस्तानात एका महिन्याच्या कमी काळात ६० रुपयांनी पेट्रोल महागले आहे. गुरुवारी शहबाज सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर ३० रुपयांनी वाढवले आहेत. नव्या किमतीनुसार पाकिस्तानात पेट्रोल २०९.८६ रुपये, गायस्पीड डिझेल २०४.१५ रुपये, लाइट डिझेल १७८.३१ रुपये या दराने विकण्यात येत आहे.

इम्रान खान यांनी सरकारवर टीका

सरकारने पेट्रोल भाववाढीच्या घेतलेल्या निर्णयावर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी टीका केली आहे. एकीकडे भआरतात पेट्रोलचे दर २५ रुपयांनी कमी करण्यात आले आणि दुसरीकडे आपल्या देशात पेट्रोलचे दर ३० रुपयांनी वाढवण्यात आलेत, अशी टीका त्यांनी केली आहे. हाच एका स्वतंत्र देशातला आणि एका गुलाम देशातला फरक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महागाईने पाकिस्तानी जनता हैराण

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या श्रीलंकेच्या पावलावर पाऊल टाकत आहे. सध्या पाकिस्तानात पेट्रोलचे भाव इतके वाढले आहेत की जनता हैराण झाली आहे. ज्या मुद्द्यांवर इम्रान खान सरकारला हटवण्यात आले, तेच मुद्दे आता सत्तेवर आलेल्या शहबाज सरकारसमोर डोकेदुखीच्या रुपात पुढे ठाकले आहेत. गेल्या काही दिवसांत सरकारने पेट्रोलच्या दरात अचानक ३० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे जनतेला मोठा धक्का बसला आहे. प्रवास करायचा कसा, असा प्रश्न आता पाकिस्तानी जनतेपुढे उभा ठाकला आहे. अनेक ठिकाणी याचा विरोधही करण्यात येतो आहे.

लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.