AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Petrol Rate : रात्रीतून 18 रुपयांची वाढ, पाकिस्तानमध्ये एक लिटरचा इतका झाला भाव

Pakistan Petrol Rate : पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने रात्रीतूनच डाव पालटला. देशातील पेट्रोलच्या भावात 18 रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची वाढ केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव भारतापेक्षा दुप्पटीहून अधिक वाढले.

Pakistan Petrol Rate : रात्रीतून 18 रुपयांची वाढ, पाकिस्तानमध्ये एक लिटरचा इतका झाला भाव
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 3:37 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : आर्थिक गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या हालअपेष्टा संपता संपत नसल्याचे दिसून येते. देशातील महागाईने (Pakistan Inflation) अगोदरच कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी गरीब पाकिस्तान जनतेची मारामार सुरु आहे. शहाबाज शरीफ सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गेल्या सोमवारी काळजीवाहून प्रधानमंत्र्याची नियुक्ती करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये निवडणुका घेण्यासाठी हे खेळी खेळण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. काळजीवाहू सरकारने आल्या आल्या जनतेला दणका दिला. या सरकारने रात्रीतूनच डाव पालटला. पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीची घोषणा केली. रात्रीतूनच पेट्रोलच्या भावात (Petrol Price) 18 रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत (Diesel Rate) 20 रुपयांची वाढ केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव भारतापेक्षा दुप्पटीहून अधिक वाढले.

पेट्रोल 300 रुपयांच्या घरात

Dawn च्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने मंगळवारी मध्यरात्री पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली. किंमतीतील बदलानुसार, पेट्रोलचा भाव 17.50 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या भावात 20 पाकिस्तानी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एक लिटर पेट्रोलचा भाव 290.45 पाकिस्तानी रुपये तर एक डिझेलचा भाव 293.40 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

काय दिले कारण

पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यासंबंधीची अधिसूचना जारी केली. त्यात इंधनाच्या नवीन किंमती बुधवारी 16 ऑगस्ट 2023 रोजी पासून लागू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. काळजीवाहू सरकारच्या या निर्णयाने पाकिस्तानी जनतेला सकाळी सकाळी मोठा झटका बसला. अगोदरच महागाईचा मार झेलणाऱ्या पाकिस्तानी जनतेसाठी हा मोठा फटका आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या दरवाढीने हा निर्णय घेतल्याचे कारण देण्यात आले.

15 दिवसांत 40 रुपयांची वाढ

पाकिस्तानच्या सरकारने केरोसीन आणि स्वस्त डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल केला नाही. शहबाज शरीफ सरकारने पेट्रोलच्या किंमतीत 19.95 पाकिस्तानी रुपया आणि डिझेलच्या किंमतीत 19.90 पाकिस्तानी रुपयाची नुकतीच वाढ केली होती. 1 ऑगस्ट रोजी ही दरवाढ झाली होती. अवघ्या 15 दिवसांत पेट्रोलमध्ये 40 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

महागाईचा कहर

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर झाला आहे. पाकिस्तान श्रीलंकेच्या पावलावर पाऊल टाकत आहे. गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानचे सर्व गणित फिस्टकले. ताजा आकड्यानुसार, जुलै महिन्यात महागाई दर 28.3 टक्के होता. यापूर्वी जून महिन्यात महागाई दर 29.4 टक्के होता. पाकिस्तानमध्ये महागाई दर मे महिन्यात 38 टक्के इतका होता. सोमवारी पाकिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार आले. पंतप्रधान अनवार-उल-हक काकड यांची काळजीवाहू पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली.

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.