Corona Vaccine | संपूर्ण जगासाठी मोठी बातमी, अमेरिकेच्या फायजर कंपनीची लस चाचणीत 90 टक्के यशस्वी
फायजर कंपनीची लस खरच यशस्वी ठरली तर संपूर्ण जगाला फार मोठा दिलासा मिळणार आहे (Pfizer Corona vaccine proves 90 percent effective in trials).
वॉशिंग्टन : संपूर्ण जग कोरोना संकटाने होरपळून निघालं आहे. कोरोनाने जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोक कोरोना लसीची वाट बघत आहेत. मात्र, आता कदाचित कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिकेच्या फायजर (pfizers) या कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे (Pfizer Corona vaccine proves 90 percent effective in trials).
फायजर लसीची ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीने केला आहे. फायजरची लस कोरोनावर प्रभावी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे या लसीकडून जितकी अपेक्षा होती त्यापेक्षाही जास्त प्रभावी हे औषध ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
फायजरची लस पूर्णपणे यशस्वी ठरली तर या महिन्याच्या अखेरपर्यंत लसीला बाजारात विक्रीची अनुमती मिळण्याची शक्यता आहे. ही लस खरच यशस्वी ठरली तर संपूर्ण जगाला फार मोठा दिलासा मिळणार आहे (Pfizer Corona vaccine proves 90 percent effective in trials).
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “कोरोनावर लवकरच लस येणार आहे. कारण ही लस चाचणीत 90 टक्के प्रभावी ठरली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
STOCK MARKET UP BIG, VACCINE COMING SOON. REPORT 90% EFFECTIVE. SUCH GREAT NEWS!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 9, 2020
अमेरिकेची कंपनी फायजर (pfizers) आणि जर्मनीची बायोएनटेक (BioNTech) कंपनी दोघे मिळून कोरोनावर लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे.
बायोएनटेक कंपनीचे सह-संस्थापक उगुर साहिन यांनी आजचा दिवस खूप मोठा दिवस असल्याचं म्हटलं आहे. “ही एक खूप चांगली बातमी आहे. विज्ञान आणि मानवतेसाठी आजचा दिवस महान आहे”, असं साहिन म्हणाले आहेत.
फायजर कंपनीचे अध्यक्ष अल्बर्ट बोरला यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “तिसऱ्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ही लस कोरोनावर प्रभावी आहे, याचा आम्हाला पुरावा मिळाला आहे”, असं अल्बर्ट यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : कोरोनाचा फटका, नागपूरमध्ये फटाके व्यावसायिकांची संख्या घटली, महापालिकेकडून 582 जणांना परवानगी