अदीस अबाबा – सध्याच्या युगात कुठल्याही प्रवासात विमान प्रवास (Air travel)हा सर्वात जलद मानण्यात येतो. विमानाची गती अगदी कमी वेळात प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवते. मात्र हीच गती कधीकधी धोक्याचीही ठरण्याची शक्यता असते. अशीच एक घटना अफ्रिकी देश इथोपियात पाहायला मिळाली आहे. नेमके झाले असे की सुडानच्या खार्तूम येथील इथोपियाची राजधानी अदीस अबाबा (Adis Ababa)जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असलेले दोन्ही पायलट लँडिंगपूर्वी गाढ झोपून (pilot slept before landing) गेले. त्यामुळे बोईंग 737चे अदीस अबाबा एयरपोर्टवर लँडिंगच होऊ शकले नाही. हे पायलट जेव्हा गाढ झोपले होते तेव्हा विमान 37 हजार फूट उंचीवर होते. पायलट झोपलेले असल्याने ना विमानाने लँडिंगसाठी स्पीड कमी केले ना विमानाने उंची कमी केली. एयर ट्राफिक कंट्रोलच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पायलटना मेसेज पाठवले, पण ते दोघेही इतक्या झोपेत होते की त्यांनी ते मेसेज पाहिलेही नाहीत.
ही घटना सोमवारची आहे. या विमानाने सुडानच्या खार्तून येथून इथोपियाच्या राजधानी अदीस अबाबासाठी टेक ऑफ केले होते. फ्लाईट अदीस अबाबा एयरपोर्टजवळ पोहचले मात्र फ्लाईट खाली येण्याचे काही चिन्हे दिसेनात. त्यावेळी एयर ट्राफिक कंट्रोलने अलर्ट जारी केला. एटीसीने अनेकदा पायलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अशा स्थितीत जेव्हा विमानाने रनवे क्रॉस केला, त्यांचा ऑटोपायलट मोड डिसकनेक्ट झाला. त्यामुळे केबिनमध्ये एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. या अलार्ममुळे या दोनी पायलटना जाग आली. त्यानंतर त्यांनी गडबडीत विमानाचे लँडिंग केले.
जाग आल्यानंतर या दोन्ही पायलटना विमान लँड करण्यासाठी 25 मिनिटांचा वेळ लागला. या काळात विमानाने एयरपोर्टभोवती अनेक वेळा चकरा मारल्या. सुदैवाने यात कोणताही अपघात झाला नाही आणि विमान सुरक्षितपणे खाली उतरले. त्यानंतर विमानाला पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर अडीच तासांच्या चौकशीनंतर विमानाला पुढचा टेक ऑफ घेण्यास परवानगी देण्यात आली. एव्हिएशन सर्विलान्स सिस्टिमने हे विमान रनवेवर न उतरता, उडून गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानाचा फ्लाीट पाथ दाखवणारा एक फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. यात हे विमान अदीस अबाबा विमानतळाच्या वर घिरट्या घालत असतानाचे दिसते आहे.
एव्हिएशन एनालिटिक्स एलेक्स मैकेरास यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे, त्यात त्यांनी घडलेला प्रकार गंभीर असल्याचे लिहिले आहे. हे पायलट खले असल्याने हा प्रकार झाल्याचे त्यांनी लिहले आहे. अशा प्रकारची एक घटना मेमध्येही घडली होती. त्यावेळी दोन पायलट विमान घेऊन न्यूयॉर्कवरुन रोमला जात होते. त्यावेळी ते दोघेही विमानात झोपले होते. त्यावेळी त्यांचेही विमान 38 हजार फूट उंचीवर होते. तपासात हे स्पष्ट झालेले आहे. आयटीए एयरवेजचे हे दोन्ही पायलट असल्याचेही सांगण्यात येते आहे.