VIDEO : मॉस्कोत विमानाला भीषण आग, 41 प्रवासी जळून खाक

मॉस्को (रशिया) : रशियातील मॉस्को येथे विमानाच्या मागील बाजूस आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. मात्र, विमानाच्या मागील बाजूस लागलेल्या आगीने मोठी जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (5 मे) घडलेल्या या दुर्घटनेत 41 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत आणि जवळपास 13 प्रवासी जखमी झाले आहेत. सुखोई सुपरजेट 100 एअरक्राफ्ट असे दुर्घटनाग्रस्त विमानाचे नाव आहे. […]

VIDEO : मॉस्कोत विमानाला भीषण आग, 41 प्रवासी जळून खाक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मॉस्को (रशिया) : रशियातील मॉस्को येथे विमानाच्या मागील बाजूस आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. मात्र, विमानाच्या मागील बाजूस लागलेल्या आगीने मोठी जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (5 मे) घडलेल्या या दुर्घटनेत 41 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत आणि जवळपास 13 प्रवासी जखमी झाले आहेत. सुखोई सुपरजेट 100 एअरक्राफ्ट असे दुर्घटनाग्रस्त विमानाचे नाव आहे.

मॉस्कोतील या विमान दुर्घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले आहेत. त्यानुसार, हे विमान आग लागल्यानंतरही रन वेवर काही अंतर पुढे जात होतं. आग इतकी भडकली की, आतील प्रवाशांची राखरांगोळी झाली. 41 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त विमानात एकूण 78 प्रवासी होते.

या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या रशियन समितीच्या माहितीनुसार, “दुर्घटनाग्रस्त विमानात क्रू मेंबर्ससह 78 जण प्रवासी होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 11 जण जखमी आहेत.”

विमान दुर्घटनेतील गंभीर जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यातील तिघांचा प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मृतांना आदरांजली वाहिली असून, जखमींची विचारपूसही केली. विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी तातडीने समिती नेमण्यात आली आहे.

सेव्हिएत युगाचा अंत झाल्यानंतरचं पहिलं प्रवाशी एअरक्राफ्ट म्हणून ‘सुखोई सुपरजेट 100’ म्हणून ओळखलं जातं. या एअरक्राफ्टला परदेशात कुणीच खरेदी करत नव्हतं. या एअरक्राफ्टच्या सुरक्षेवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. 2012 मध्ये डेमो फ्लाईट दरम्यान इंडोनिशियामध्ये सुखोई सुपरजेट 100 एका डोंगरावर आदळला होता, त्यावेळी 45 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

पाहा व्हिडीओ :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.