AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Europe Visit : तीन देश 25 बैठका, 8 जागतिक नेत्यांच्या भेटी, पंतप्रधानाच्या युरोप दौऱ्यात काय खास आहे ?

पंतप्रधान मोदींचा यावर्षीचा पहिला युरोप दौरा खूप खास आहे. कारण युरोपातील बहुतांश देश युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला विरोध करत आहेत. या देशांनी रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत.

PM Modi Europe Visit : तीन देश 25 बैठका, 8 जागतिक नेत्यांच्या भेटी, पंतप्रधानाच्या युरोप दौऱ्यात काय खास आहे ?
पंतप्रधानाच्या युरोप दौऱ्यात काय खास आहे ?Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 3:30 PM

नवी दिल्ली – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तीन दिवसांच्या महत्त्वाच्या युरोप (Europe) दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा आज सुरू झाला असून ते 4 मे पर्यंत दोऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान आज जर्मनीत (Germany) पोहोचले आहेत. तिथून ते डेन्मार्क आणि जर्मनीला जाणार आहेत. तीन देशांच्या युरोप दौऱ्यात पंतप्रधान मोदी एकूण 65 तासांत 25 बैठकांना उपस्थित राहणार आहेत. तसेच ते 8 जागतिक नेत्यांना भेटणार आहेत असल्याची माहिती मिळाली आहे. यावर्षातला मोंदीचा हा पहिला परदेश दौरा आहे. आयोजित तीन दिवसीय दौऱ्यात ते भारतीय नागरिकांची आणि व्यावसायिकांची सुध्दा भेट घेणार आहेत. डेन्मार्क आणि जर्मनीत एक-एक दिवस राहणार आहेत. यानंतर ते फ्रान्सला जाऊन पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा यावर्षीचा पहिला युरोप दौरा खूप खास आहे. कारण युरोपातील बहुतांश देश युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला विरोध करत आहेत. या देशांनी रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. दुसरीकडे, भारताने आतापर्यंत तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. पण भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांना चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली आहे.

या दौऱ्यातील खास भेटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. युरोप दौऱ्यात या खास भेटी राहणार आहेत.

  1. जर्मनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी बर्लिनमध्ये जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी चर्चा करणार आहेत. नवीन सरकारच्या स्थापनेनंतरची ही पहिली IGC असेल. पंतप्रधान मोदी आणि चॅन्सलर स्कॉल्झ एका व्यावसायिक कार्यक्रमाला संबोधित करतील. याशिवाय पीएम मोदी जर्मनीतील एका भारतीय समुदायाला मार्गदर्शन करणार आहेत.
  2. डेन्मार्क जर्मनीनंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जर्मनीची राजधानी कोपनहेगनमध्ये डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन आणि राणी मार्गरेथे यांच्याशी एक बैठक होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी भारत-डेन्मार्क येथील व्यवसाय व्यासपीठावरून भारतीयांना संबोधित करतील. भारत-नॉर्डिक समिटमध्ये, पंतप्रधान मोदी आइसलँडच्या पंतप्रधान कॅटरिन जेकब्सडोटीर, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर, स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन आणि फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांच्यासोबत एक बैठक होईल. 2018 मध्ये स्टॉकहोम येथे पहिली भारत-नॉर्डिक शिखर परिषद झाली होती.
  3. फ्रान्स पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्याच्या शेवटच्या फेरीत काही काळ फ्रान्समध्ये राहणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करतील. भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत.

पंतप्रधान मोदींचे जर्मनीत स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बर्लिनमधील हॉटेल एडलॉन केम्पिंस्की येथे आगमन झाले. त्यावेळी भारतीय रहिवाशांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पंतप्रधान मोदी आज जर्मनीच्या चांसलरची भेट घेतील. सहाव्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलतीचे सह-अध्यक्ष होतील.