PM Modi In France : AI ने नोकऱ्या जाणार ? काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
PM Modi At AI Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांच्या सोबत त्यांनी बहुप्रशिक्षित एआय एक्शन परिषदेचे सह अध्यक्ष पद भूषवले आहे या एआय शिखर संमेलनात सहभाग घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यापासून सावध देखील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एआयची जागतिक परिषद फ्रान्सच्या पॅरीस येथे भरली आहे. या एआय परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले आहे. आर्टीफिशियल तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत आहे. या तंत्रज्ञानामुळे धोके जरी वाढले असले तरी त्याचा उपयोग शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि इतर मानवी कामांसाठी करणे गरजेचे आहे. एआयमुळे नोकऱ्या जातील ही मोठी भीती व्यक्त होत आहे. परंतू प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आले तेव्हा अशीच भीती व्यक्त केली गेली. परंतू नवीन तांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होतच गेल्या त्यामुळे एआय तंत्रज्ञानाला न घाबरता त्याचा उपयोग दैनंदिन गरजांसाठी करणे गरजेचे आहे. खास करुन शाश्वत विकासासाठी त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत संबोधताना म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) विकास वेगाने होत आहे. भारत या क्षेत्रातील आपला अनुभव आणि विशेषत: शेअरिंग करण्यासाठी तयार आहे हे म्हणजे एआयचे भविष्य सर्वासाठी चांगले होईल. आम्ही सार्वजनिक भल्यासाठी एआय एप्लीकेशन विकसित करीत आहोत. भारताने आपल्या १.४ अब्ज लोकसंख्येसाठी एकदम कमी भांडवलात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेला यशस्वीपणे तयार केले आहे. आम्हाला एआय संदर्भातील मुद्द्यांचा निपटारा करण्यासाठी जागतिक मानकांची गरज आहे.
नोकऱ्या जातील ही भीती निराधार
एआयने सायबर गुन्हेगारी संदर्भातील धोके निर्माण झाले आहेत. तसेच फेक न्यूज आणि इतरही धोके दिसत आहेत. सायबर सिक्युरिटी, डीपफेक असे धोके आहेतच त्यासाठी एक निती ठरविण्याची गरज आहे. एआयने नोकऱ्या जातील ही सर्वात मोठी भीती आहे. परंतू इतिहास याला साक्षी आहे जेव्हा कोणतेही तंत्रज्ञान येते तेव्हा नोकऱ्या जात नाहीत उलट कामाचे स्वरुप बदलते आणि नव्या पद्धतीचे जॉब आपोआप तयार होतात असेही पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.




फ्रान्ससोबत शाश्वत विकास करु
मानवी मेंदू कविता करु शकतो आणि स्पेस शिप देखील तयार करु शकतो. एआय तंत्रज्ञानाने आपण या गोष्टी देखील करु शकतो आणि आपला शाश्वत विकास देखील करु शकतो. डेटा प्रायव्हसी हे मोठे आव्हान आहे. परंतू सर्वसामान्यासाठी आणि शाश्वत ऊर्जा सौर ऊर्जच्या क्षेत्रात आज फ्रान्स सोबत आम्ही काम करीत आहोते. ग्रीन पॉवर हे उद्याचे भविष्य आहे. त्यासाठी फ्रान्सचे आम्हाला सहकार्य हवे असेही ते यावेळी म्हणाले