PM Modi in US : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. त्यानंतर मोदी आणि बायडन यांनी हस्तांदोलन केलं आणि दोन्ही नेत्यांमध्ये ओवल कार्यालयात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात झाली. बैठकीला सुरुवात होताना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी एक ट्वीट करत बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती दिली.

PM Modi in US : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये बैठक
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 10:18 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक सुरु आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जो बायडन यांचे आभार मानले. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. त्यानंतर मोदी आणि बायडेन यांनी हस्तांदोलन केलं आणि दोन्ही नेत्यांमध्ये ओवल कार्यालयात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात झाली. बैठकीला सुरुवात होताना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी एक ट्वीट करत बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती दिली. (Discussions between PM Narendra Modi and US President Joe Biden on important issues including trade and security)

या भेटीदरम्यान राष्ट्रपती जो बायडेन यांनी पुढील आठवड्यात येणारी गांधी जयंत साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात आम्ही गांधी जयंती साजरी करणार आहोत. गांधीजींचा अहिंसेचा संदेश आज पहिल्यापेक्षा अधिक पटीने महत्वाचा आहे, असं बायडन म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी मानले बायडेन यांचे आभार

बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जो बायडेन यांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, ‘मी आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचं जोरदार स्वागत केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. यापूर्वीही आपल्याला चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळी आपण भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांबाबत आपलं व्हिजन सांगितलं होतं. आज आपण भारत-अमेरिका संबंधांसाठी आपलं व्हिजन लागू करण्याबाबत पहिलं पाऊल टाकलं आहे’.

मोदी आणि बायडेन यांच्यात व्यापारावर चर्चा

त्याचबरोबर बायडेन यांच्या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, मी पाहतोय की या दशकात तुमच्या नेतृत्वात आपण जे बीज लावू ते भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगातील लोकशाही देशांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये व्यापार हा महत्वाचा घटक आहे. या दशकात आपण एकमेकांना पूरक होऊ शकू. अमेरिकेकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची भारताला गरज आहे. तर भारताकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या अमेरिकेच्या उपयोगी येतील. या दशकात व्यापार एक प्रमुख क्षेत्र असेल, असंही मोदी यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

UPSC Civil Services Main 2020 Result : यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण 761 परीक्षार्थी उत्तीर्ण

VIDEO | पालकांनो, तुमचा मुलगा, मुलगी काय करते याकडे लक्ष द्या; अजितदादांचं नेमकं आवाहन काय?; वाचा सविस्तर

Discussions between PM Narendra Modi and US President Joe Biden on important issues including trade and security

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.