Modi Invites Pope Francis: पोपचं भारतात 22 वर्षांनी आगमन होणार?
2013 मध्ये पोप झाल्यापासून फ्रान्सिस यांनी भेट घेतलेले मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटीला पोहोचून पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांच्यात ही पहिलीच वन-ऑन-वन भेट होती. (PM Modi invites Pope Francis to India, will he visit India after 22 years)
2013 मध्ये पोप झाल्यापासून फ्रान्सिस यांनी भेट घेतलेले मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.
पोपचं भारतात 22 वर्षांनी आगमन होईल ?
पोपची शेवटची भारत भेट 1999 मध्ये झाली होती. त्या दरम्यान अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि पोप जॉन पॉल द्वितीय भारत भेटीवर आले होते. पोप फ्रान्सिस भारत भेटीला आले तर ही कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोपचं भारतात 22 वर्षांनी आगमन होईल आणि ही एक ऐतिहासीक भेट ठरेल.
“पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले,” असं पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर ट्विट केलं.
Had a very warm meeting with Pope Francis. I had the opportunity to discuss a wide range of issues with him and also invited him to visit India. @Pontifex pic.twitter.com/QP0If1uJAC
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2021
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी शुक्रवारी सांगितले होते की, पंतप्रधान पोपसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. ‘पंतप्रधान पोपला वैयक्तिकरित्या भेटणार आहेत,’ असं त्यांनी आजच्या भेटीची माहिती देतांना सांगितले होते.
व्हॅटिकनमध्ये मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही उपस्थित होते. पंतप्रधानांनी व्हॅटिकन सिटीचे परराष्ट्र मंत्री कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन यांचीही भेट घेतली.
पंतप्रधान मोदी कुठल्या देशांच्या राष्ट्रपतींना भेटणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G-20 देशांच्या शिखर बैठकीसाठी इटली येथे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांची भेट घेतली. मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. याशिवाय पंतप्रधान मोदींनी यूरोपियन यूनियनच्या नेत्यांची देखील भेट घेतली. याचबरोबर पंतप्रधान मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपतींची, सिंगापूरच्या पंतपध्रानांशी देखील मोदींची भेट होणार आहे. या सर्व नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी जागतिक, आर्थिक, राजकीय व कोरोना महामारीबाबत स्वतत्रपणे चर्चा करतील.
पंतप्रधान मोदींची इटलीमध्ये EU च्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक संपन्न, G20 शिखर परिषदेत अनेक द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षाhttps://t.co/XksH0KxSZA#PMNarendraModi |#EU |#Meeting |#G20Summit
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 29, 2021
Other News
VIDEO: नाव काय तुमचं?, इथे काय करता?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता
(PM Modi invites Pope Francis to India, will he visit India after 22 years)