PM Modi in US: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासंदर्भात चर्चा, मोदी-बायडन भेटीत आश्वासक सूर

PM Modi in US | या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळायला हवं, असे मत व्यक्त केले. तसे भारत आणि अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मोदी आणि बायडन यांच्यात अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भातही चर्चा झाली.

PM Modi in US: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासंदर्भात चर्चा, मोदी-बायडन भेटीत आश्वासक सूर
मोदी-बायडन
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 7:59 AM

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या पहिल्या द्विपक्षीय बैठकीचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी कोविड -19 आणि हवामान बदल, व्यापार आणि इंडो-पॅसिफिकसह अनेक प्राधान्य मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीबद्दल माहिती देताना भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची ही पहिली भेट होती.

या भेटीवेळी जो बायडन यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले. त्यांनी लसीची निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. याशिवाय भारत-अमेरिका संरक्षण संबंधांवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात नवीन उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळायला हवं’

या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळायला हवं, असे मत व्यक्त केले. तसे भारत आणि अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मोदी आणि बायडन यांच्यात अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भातही चर्चा झाली. या भेटीनंतर आता पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कला रवाना होतील. याठिकाणी ते संयुक्त राष्ट्रांच्या 76व्या आमसभेला संबोधित करतील.

पीएम मोदींची सातव्यांदा अमेरिकेला भेट

2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 7 व्या वेळी अमेरिकेला भेट दिली आहे. ते म्हणाले होते की त्यांचा हा दौरा भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रपती बायडेन यांच्याशी परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी असेल. भारत-अमेरिका द्विपक्षीय शिखर परिषदेच्या अगोदर, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, या मुद्द्यांमध्ये सहकार्याच्या नवीन क्षेत्रांविषयी चर्चा देखील समाविष्ट आहे.

अमेरिकेत गांधी जयंती साजरी होणार

या भेटीदरम्यान राष्ट्रपती जो बायडेन यांनी पुढील आठवड्यात येणारी गांधी जयंत साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात आम्ही गांधी जयंती साजरी करणार आहोत. गांधीजींचा अहिंसेचा संदेश आज पहिल्यापेक्षा अधिक पटीने महत्वाचा आहे, असं बायडन म्हणाले.

पंतप्रधान मोदींकडून बायडेन यांचे आभार

बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जो बायडेन यांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, ‘मी आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचं जोरदार स्वागत केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. यापूर्वीही आपल्याला चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळी आपण भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांबाबत आपलं व्हिजन सांगितलं होतं. आज आपण भारत-अमेरिका संबंधांसाठी आपलं व्हिजन लागू करण्याबाबत पहिलं पाऊल टाकलं आहे’.

संबंधित बातम्या:

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा, 5 महत्वाचे मुद्दे

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मानले आभार, दोन नेत्यांमध्ये चर्चा सुरु

हॅरिस यांना आजोबांच्या आठवणी, मॉरिसन यांना समुद्री मैत्रीचं प्रतीक, तर जापानला बुद्धाचे विचार, वाचा अमेरिकेच्या दौऱ्यात मोदींनी कुणाला काय गिफ्ट दिलं!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.