काश्मीर प्रश्नी जे योग्य असेल ते मोदीच करतील : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय मुद्दा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितलं आणि पंतप्रधान मोदी हा प्रश्न सोडवतील याविषयी अपेक्षा व्यक्त केली.
बैरट्स, फ्रान्स : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढून राज्याचं पुनर्गठन केल्यापासून काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय. पण हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यासपीठावर फक्त स्पष्टच केलं नाही, तर जागतिक नेत्यांनी ते मान्यही केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय मुद्दा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितलं आणि पंतप्रधान मोदी हा प्रश्न सोडवतील याविषयी अपेक्षा व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती आणि पाकिस्तानलाही हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्यात रस आहे. पण भारताने पाकिस्तानचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी केला. बैरट्समधील G-7 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्वीपक्षीय बैठक झाली. बैठकीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर माहिती दिली.
#WATCH: Prime Minister Narendra Modi during bilateral meeting with US President Donald Trump at #G7Summit says,"All issues between India & Pakistan are bilateral in nature, that is why we don't bother any other country regarding them." pic.twitter.com/H4q0K7ojZT
— ANI (@ANI) August 26, 2019
यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “गेल्या रात्री पंतप्रधान मोदी यांच्याशी सकारात्मक बैठक झाली, ज्यात काश्मीरविषयी देखील चर्चा केली. हा प्रश्न नियंत्रणात असल्याची पंतप्रधान मोदी यांना खात्री आहे. त्यांची पाकिस्तानशीही चर्चा झाली आहे आणि मला खात्री आहे की जे चांगलं आहे ते मोदी करतील.”
या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनीही पुन्हा एकदा भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र 1947 च्या पूर्वी एकत्रच होते. दोन्ही राष्ट्रांमधील प्रश्नासाठी आम्ही तिसऱ्या देशाला कष्ट देणार नाही. आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवू, असं मोदींनी सांगितलं.
इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आपण स्वतः फोन करुन शुभेच्छा दिल्याची आठवणही मोदींनी करुन दिली. भारत आणि पाकिस्तान दारिद्र्याविरोधात लढण्यासाठी एकत्र येऊ शकतात आणि लोकांचं कल्याणही करु शकतात, असं मोदी म्हणाले.
संबंधित ब्लॉग आणि बातम्या वाचा :