वाढती कट्टरता जगासाठी नवं आव्हान, अफगाणिस्तान ताजं उदाहरण, SCO संमेलनात मोदींचं रोखठोक भाषण

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यावर भाष्य करत कट्टरतावादी शक्तींना रोखण्याची जगाला गरज असल्याचं म्हटलं आहे.

वाढती कट्टरता जगासाठी नवं आव्हान, अफगाणिस्तान ताजं उदाहरण, SCO संमेलनात मोदींचं रोखठोक भाषण
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 1:28 PM

दुशांबे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यावर भाष्य करत कट्टरतावादी शक्तींना रोखण्याची जगाला गरज असल्याचं म्हटलं आहे. शांघाई सहयोग संघटन म्हणजेच SEO संमेलन पंतप्रधान मोदी बोलत होते. अफगाणिस्तानात घडलेली ताजी घटना ही कट्टरतावाद किती मोठं आव्हान आहे हे स्पष्ट करते, त्यामुळे कट्टरतावादाविरोधातील लढाई ही केवळ क्षेत्रिय सुरक्षेसाठीच नाही तर तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही गरजेची असल्याचं मोदी म्हणाले. ( PM Modi’s remarks on radicalism in Afghanistan at SCO summit Welcome to Iran-Saudi Arabia-Qatar )

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संमेलनात नव्याने सहभागी झालेल्या ईराणचं स्वागत केलं. मोदी म्हणाले, ‘यंदा SCO चं 20 वं वर्ष आहे, आनंदाची गोष्टी ही आहे की या चांगल्या मुहूर्तावर आपल्यासोबत नवीन मित्र आले आहेत. मी ईराणचं नवीन मित्राच्या रुपाने स्वागत करतो. मी तिन्ही नवीन डायलॉग पार्टनर सउदी अरब, इजिप्त आणि कतरचंही स्वागत करतो.’

SCOला मजबूत नेटवर्क बनवण्याची गरज

पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात, उदारतावादी, सहिष्णु मुस्लिमांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एससीओने इस्लामशी निगडीत उतारवादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्था आणि परंपरांना मजबूत करण्यासाठी काम करायला हवं. भारतासह सर्वच इस्लामिक देशांमध्ये उदारतावादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्थानं आणि परंपरा आहेत. एससीओला या सर्वांमध्ये एक मजबूत नेटवर्क बनवण्याची गरज आहे.

मोदी पुढे म्हणाले की, इतिहासावर नजर टाकली, तर मध्य आशिया हा उदारतावादी आणि प्रगतीशील संस्कृती आणि मुल्यांचं माहेरघर राहिला आहे. सूफीवादासारखी परंपरा इथं शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. आणि हाच आपला वारसा आपल्याला जगामध्ये पसरवायचा आहे.

तंत्रज्ञानाच्या देवणाघेवणीवर भाष्य

मोदी म्हणाले की, आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी UPI असो, Rupe Card असो कि कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेलं आरोग्य सेतू आणि कोविन अॅप. ही सर्व डिजीटल टेक्नॉलॉजी आम्ही इतर देशांसोबत शेअर केली आहे आणि यापुढेही तंत्रज्ञान शेअर करत राहू.

आखाती देशांशी संवाद वाढवण्यास भारताचा पुढाकार

आशिया खंडातील देशांमध्ये संवाद वाढवण्याची गरज पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवली. भारत मध्य आशियातील देशांसोबत आपले संबंध अधिक चांगले करण्यास कटीबद्ध आहे असं मोदी म्हणाले. पुढं ते म्हणाले की, भारतीय बाजाराशी जोडल्याने मध्य आशियायी देशांना खूप फायदा होणार आहे. संवाद हा एकतर्फी नसतो, त्यामुळे पुढाकार दोन्ही बाजूंनी घ्यायला हवा.

ताजिक लोकांच्या स्वागताने भाषणाची सुरुवात

पंतप्रधान मोदींनी ताजिक लोकांचं स्वागताने भाषणाची सुरुवात केली. हे संमेलन ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये होत आहे. तिथं मोदी म्हणाले की, मी संपूर्ण भारताकडून ताजिक बंधु-भगिणींचं स्वागत करतो.

शिखर बैठकीनंतर संपर्क बैठक होणार आहे, यामध्ये अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. याशिवाय क्षेत्रिय सुरक्षा, सहयोग आणि संवाद यावरही चर्चा होऊ शकते. ताजिकीस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमान हे या बैठकीचे अध्यक्ष आहेत. भारताचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.