PM Narendra Modi America visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना, तीन मुद्द्यावर चर्चा अपेक्षित
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्यासाठी (America tour) रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ( Jo Biden ) 24 सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉग्शिंटन इथं भेटणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्यासाठी (America tour) रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ( Jo Biden ) 24 सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉग्शिंटन इथं भेटणार आहेत. बायडन सत्तेवर आल्यानंतर ही मोदींची पहिली भेट असेल. पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी PMO ने त्यांचा या दौऱ्यातील कार्यक्रम जाहीर केला.
पंतप्रधानांचा हा दौरा भारतासाठी महत्त्वाचा आहे. हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव, अफगाणिस्तानमधील घडामोडी, अमेरिकेसोबतचे व्यावसायिक संबंध यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे.
PM Narendra Modi departs from New Delhi for his visit to US where he will attend the first in-person Quad Leaders’ Summit, hold bilateral meetings, and address United Nations General Assembly pic.twitter.com/325vac5pK9
— ANI (@ANI) September 22, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा कशासाठी?
अमेरिकेत क्वाड देशांची बैठक होणार आहे. यामध्ये भारत-अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जापानचे पंतप्रधान सामील होतील. या दौऱ्यात तालिबान, चीन आणि कोरोनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर 25 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करतील.
मी 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहे. माझ्या अमेरिका भेटीदरम्यान, मी अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेईन आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर विचारांची देवाणघेवाण करेन, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना भेटण्यासाठीही उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याशी संभाषणासाठी उत्सुक आहे, असं मोदींनी सांगितलं.
शिखर सम्मेलन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानी पंतप्रधान योशीहिडे सुगा यांच्यासह क्वाड शिखर परिषदेत सहभागी होतील.
द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करणे
पंतप्रधान मोदी म्हणाले की ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांनाही भेटतील. या बैठकीदरम्यान, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी जपान आणि ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली जाईल.
महासभेतील भाषणाने समारोप
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधानांच्या भाषणाने मोदींचा दौरा पूर्ण होईल. मोदी म्हणाले, “मी माझ्या भेटीचा समारोप संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला केलेल्या अभिभाषणासह करणार आहे, ज्यामध्ये कोविड -19 महामारी, दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल.”
आपल्या अमेरिका दौऱ्यामुळे अमेरिका-भारत, जपान-भारत यांच्यासह जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल. आपसातील सहयोगाला चालना देऊन व्यावसायिक संबंध सुधारतील असा विश्वास पंतप्रधान मोदींना आहे.
संबंधित बातम्या