पीएम नरेंद्र मोदी यांचा थेट पुतिन यांना फोन, रशिया-यूक्रेन युद्धाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी नुकतेच पोलंड आणि युक्रेन दौरा करत भारतात परतले आहेत. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. संघर्षावर लवकर आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. सोशल मीडियावर माहिती देताना पीएम मोदींनी दोन्ही देशांमधील विशेष आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर झालेल्या चर्चेची माहिती दिली.

पीएम नरेंद्र मोदी यांचा थेट पुतिन यांना फोन, रशिया-यूक्रेन युद्धाबाबत मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 3:29 PM

PM modi call to Putin : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केलाय. नुकत्याच झालेल्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत महत्त्वाची चर्चा केली आहे. पीएम मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणाची माहिती ट्विट केलीये. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, आज मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सात विशेष आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्ष आणि युक्रेनच्या नुकत्याच भेटीतून मिळालेल्या दृष्टीकोनांवर विचार विनिमय केला. पीएम मोदींनी लिहिले की त्यांनी संघर्षावर लवकरच चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

भारताने मध्यस्थी करण्याचं आवाहन

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियासोबत शांतता चर्चेसाठी भारताने पुढे यावे असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी रशिया दौऱ्यावर गेले होते. तेथून आल्यानंतर मोदींनी युक्रेन आणि पोलंडचा दौरा केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑगस्ट रोजी मायदेशी परतले आहेत. युक्रेन भेटीबाबत पीएम मोदी म्हणाले होते की, माझा युक्रेन दौरा ऐतिहासिक होता. भारत-युक्रेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मी या महान देशात आलो आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संभाषण फलदायी ठरले. शांतता कायम राहिली पाहिजे यावर भारताचा ठाम विश्वास आहे. ते म्हणाले होते की, मी युक्रेन सरकार आणि लोकांचे आदरातिथ्य केल्याबद्दल आभारी आहे.

भारताचं शांतता राखण्यासाठी आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना शांततेच्या मार्गाने चर्चा करुन संघर्षावर उपाय काढण्याबाबत नेहमीच भूमिका घेतली आहे. भारताने रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांतील संघर्षामध्ये तटस्थ भूमिका घेतली. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरुच आहे. भारताचे पंतप्रधान युक्रेन दौऱ्यातून भारतात परतताच रशियाकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्यात आला. यावेळी रशियाने वीज केंद्रांना लक्ष्य केले ज्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.