PM Narendra Modi in Ukraine : युक्रेनच ते क्षेपणास्त्र, जे भारताच्या सर्वात भरवशाच्या फायटर जेटला बनवतं अधिक घातक
PM Narendra Modi in Ukraine : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. मागच्या 30 वर्षात युक्रेन दौऱ्यावर जाणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. युक्रेन युद्धाच्या आगीत होरपळत असताना मोदी तिथे गेले आहेत. युक्रेनकडून भारताला अशा एक मिसाइलचा पुरवठा होतो, त्यामुळे भारतीय फायटर जेट अधिक घातक बनलय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. काही तासांसाठी त्यांचा हा युक्रेन दौरा आहे. फार कमी जणांना माहित असेल, युक्रेन भारताचा डिफेन्स पार्टनर आहे. त्यामुळे मोदींचा युक्रेन दौरा महत्त्वाचा आहे. सध्या रशिया-युक्रेनमध्ये मागच्या अडीच वर्षांपासून युद्ध सुरु आहे. मागच्या 30 वर्षात युक्रेन दौऱ्यावर जाणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भारत आणि युक्रेनमध्ये डिफेन्स टेक्नोलॉजी आणि शस्त्रास्त्रांचा आदान-प्रदान होत असतं. भारत युक्रेनमध्ये बनणाऱ्या R-27 मिसाइलचा वापर करतो. हवेतून हवेत वार करण्यासाठी R-27 मिसाइलचा वापर होतो. इंडियन एअर फोर्स SU-30MKI फायटर जेटमध्ये या मिसाइलचा वापर करत आहे. युक्रेन स्वतंत्र झाल्यापासून सैन्याशी संबंधित टेक्नोलॉजी आणि उपकरणाच्या माध्यमातून भारताशी संरक्षण सहकार्य सुरु आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात R-27 मिसाइलची निर्मिती होते. भारत दोन्ही देशांकडून हे मिसाइल आयात करतो.
युक्रेन आणि भारतामध्ये आधीच 70 मिलियन अमेरिकी डॉलरचे चार वेगवेगळे संरक्षण करार झाले आहेत. यात युक्रेनकडून होणाऱ्या R-27 मिसाइलचा पुरवठा सुद्धा आहे. युक्रेन फक्त शस्त्रच देत नाहीय, तर त्या अस्त्राची देखभाल आणि विकासात सुद्धा मदत करतोय. भारताला AN-178 विमान देण्याचेही संकेत युक्रेनने दिले आहेत.
किती देशांना क्षेपणास्त्राचा पुरवठा होतो?
R-27 हवेतून हवेत मारा करणारी गायडेड मिसाइल आहे. या मिसाइलच डिझाइन एप्रिल 1962 मध्ये बनवण्यात आलं होतं. 1986 मध्ये उत्पादन सुरु झालं. आज रशियाची फर्म विम्पेल आणि यूक्रेनची फर्म आर्टेम या क्षेपणास्त्राची निर्मिती करतात. जगभरातील 25 पेक्षा अधिक देशांना वेगवेगळ्या वर्जनचा पुरवठा सुरु आहे. सर्व प्रकारच्या फायटर विमानात या क्षेपणास्त्राचा वापर होतो. रोटरक्राफ्ट, क्रूज मिसाइल आणि मानव रहीत विमानांवर हल्ला करण्यासाठी हे क्षेपणास्त्र बनवण्यात आलं आहे.
युक्रेन कधी स्वतंत्र झाला?
1991 साली सोवियत संघाच विघटन झालं. त्यानंतर युक्रेन स्वतंत्र देश बनला. तेव्हापासून एकही भारतीय पंतप्रधान तिथे गेलेला नाही. एकवेळ युक्रेन सोवियत संघाचा भाग होता. त्यामुळे युक्रेनकडे सुद्धा रशियाप्रमाणे महत्त्वाची संरक्षण टेक्नोलॉजी आहे. भले, कुठला भारतीय पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर गेला नसेल, पण भारतासोबत चांगले संरक्षण सहकार्य करार आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवस पोलंडमध्ये होते. आज ते युक्रेनची राजधानी कीव येथे ट्रेनने पोहोचले. कारण युद्धग्रस्त देशात हवाई प्रवास शक्य नाही.