Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Foreign Tour : 5 सेकंदात 80 हजार लोकांचा मृत्यू झालेल्या शहराला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार भेट

PM Modi Foreign Tour : लिटिल बॉय 3.5 मीटर लांबीचा, 4.3 टन वजनाचा निळा सफेद बॉम्ब होता. हा बॉम्ब इतका शक्तीशाली होता की, एका मिनिटात शहराचा 80 टक्के भाग राख झाला.

PM Modi Foreign Tour : 5 सेकंदात 80 हजार लोकांचा मृत्यू झालेल्या शहराला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार भेट
PM Modi Hiroshima visit
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 4:05 PM

टोक्यो : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. नरेंद्र मोदी जापानचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री हिरोशिमा शहरात दाखल होतील. तिथे G-7 शिखर सम्मेलन आहे. हिरोशिमाच नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो, अमेरिकेचा अणवस्त्र हल्ला. जगात सर्वप्रथम अणवस्त्राचा वापर याचा हिरोशिमासाठी झाला होता. अणूबॉम्ब किती भयानक आहे, मानवी जीवन कसं उद्धवस्त होऊ शकतं? याच हिरोशिमा शहर उत्तम उदहारण आहे. आज 78 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरोशिमा शहरामध्ये जाणार आहेत.

जापानमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड सम्मेलनात सहभागी होतील. त्यानंतर अण्वस्त्र हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली देण्यासाठी हिरोशिमा येथील स्मारकावर जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोरिया, वियतनाम आणि अन्य देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा होईल.

किती किलो वजनाचा होता अणूबॉम्ब ?

दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8.15 ;च्या सुमारास अमेरिकेच्या फायटर जेटने हिरोशिमा शहरात ‘लिटिल बॉय’ नावाचा अणूबॉम्ब टाकला होता. 64 किलो युरेनियमने बनवलेला हा अणूबॉम्ब B-29 बॉम्बर विमानातून टाकण्यात आला होता.

अणूबॉम्ब पडल्यानंतर काय झालं?

लिटिल बॉय 3.5 मीटर लांबीचा, 4.3 टन वजनाचा निळा सफेद बॉम्ब होता. हा बॉम्ब इतका शक्तीशाली होता की, एका मिनिटात हिरोशिमा शहराचा 80 टक्के भाग राख झाला. बॉम्ब पडल्यानंतर 29 किलोमीटरच्या भागात काळा पाऊस पडला होता.

5 सेकंदात किती हजार लोकांचा मृत्यू?

विमानातून बॉम्ब टाकल्यानंतर 43 सेकंदांनी जमिनीपासून 585 मीटर उंचीवर फुटला होता. हिरोशिमा शहरातील वर्दळीच्या IOE पुलावर हा बॉम्ब टाकण्याची योजना होती. पण वारे वेगाने वाहत असल्यामुळे टार्गेट साध्य झालं नाही. एका रुग्णालयावर जाऊन हा बॉम्ब पडला. बॉम्ब पडल्यानंतर अवघ्या 5 सेकंदात 80 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेने जपानावर अणूबॉम्ब का टाकला?

या अणवस्त्र हल्ल्यात 1 लाख 25 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. जापानने अमेरिकेच बंदर पर्ल हार्बरवर हवाई हल्ला केला होता. त्यात अमेरिकेच बरच नुकसान झालं होतं. या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेने हिरोशिमा शहरावर अणूबॉम्ब टाकला.

आता हिरोशिमा कसं आहे?

हिरोशिमा शहर हे होंशूमध्ये आहे. जापानच हे एक मोठं शहर आहे. जापानची बरीच लोकसंख्या या शहरात वास्तव्याला आहे. सुनियोजित विकास आणि जलस्त्रोतांच्या चांगल्या मॅनेजमेंटमुळे हिरोशिमाची जापानच्या सुंदर शहरांमध्ये गणना होते. राजधानी टोक्योसोबतच चीन, तायवान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये हिरोशिमामधून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. विविध शिक्षण संस्था, विद्यापीठं, कल्चरल सेंटर आणि रॉयल कॅसल यामुळे इथली सांस्कृतिक विविधता दाखवतात. हिरोशिमा शहरामध्ये अणवस्त्र हल्ला झाल्याच्या काही खूणा आजही आहेत. पण आता या शहराच रुपड पार बदलून गेलं आहे. अणवस्त्र हल्ला इथे झालाय, असं तुम्हाला कधी वाटणार नाही. लाखो पर्यटक हिरोशिमा शहराला भेट देण्यासाठी येत असतात.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.