PM Modi Russia Tour : मोदी आज मैत्री धर्म निभावणार, यामुळे जगातल्या कोणत्या देशांचा जळफळाट होणार?

PM Modi Russia Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल. भारत-रशियाचे अनेक दशकापासूनचे संबंध आहेत. मोदींच्या या रशियात दौऱ्यामागे मोठ आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा आहे. दोन्ही नेत्यांची शेवटची भेट उज्बेकिस्तानच्या शिखर परिषदेत सप्टेंबर 2022 मध्ये झाली होती.

PM Modi Russia Tour : मोदी आज मैत्री धर्म निभावणार, यामुळे जगातल्या कोणत्या देशांचा जळफळाट होणार?
PM Modi-Putin
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 12:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने मॉस्कोमध्ये उतरतील, त्यावेळी तिथल्या थंड हवेत त्यांचं उत्साही, जोरदार स्वागत होईल. रशिया आणि भारतामधील संबंध नवीन नाहीत. शीत युद्धापासून दोन्ही देशांमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर या संबंधांच महत्त्व आणखी वाढलय. भारत आणि रशियाची मैत्री शीत युद्धाच्या काळात आणखी घट्ट झाली. त्यावेळी जग दोन गटांमध्ये विभागलेलं होतं. भारत आणि रशियाने एकमेकांना साथ दिली. सध्या पाश्चिमात्य देशांनी खासकरुन अमेरिका, युरोपियन देशांनी रशियावर प्रतिबंध लादले आहेत. या संकटकाळात भारत आणि चीन रशियाचे सर्वात मोठे तेल खरेदीदार देश बनले आहेत. भारत आणि रशियाचे रणनितीक संबंध यातून लक्षात येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने युक्रेन संघर्षावर एक संतुलित धोरण स्वीकारलं. दोन्ही देशांनी शांततामय मार्गाने तोडगा काढावा, ही भारताची भूमिका आहे. त्याचवेळी भारताने रशियावर टीका करण सुद्धा टाळलं. कुठल्याही बाजूला नाराज न करता यातून भारताच कुटनितीक कौशल्य दिसून येतं.

भारत-रशिया संबंधात आव्हान काय?

रशिया आणि भारताची मैत्री आता अधिक घट्ट होत चालली आहे. त्यामुळे दोन्ही देशांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. चीन हा भारताचा मुख्य स्पर्धक आहे, आज तो सुद्धा रशियाच्या तितक्याच जवळ आहे. हे त्रिकोणी संबंध इतके किचकट आहेत की, पीएम मोदी यांनी शंघाई सहयोग संघटनेच्या (SCO) शिखर सम्मेलनात सहभागी होण्याऐवजी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना कजाकिस्तानच्या अस्ताना येथे बैठकीसाठी पाठवलं. या बैठकीला रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग सुद्धा हजर होते.

10 वर्षात मोदी-पुतिन कितीवेळा ऐकमेंकाना भेटले?

पीएम मोदी शेवटचे 2019 मध्ये व्लादिवोस्तोक येथे रशियन दौऱ्यावर गेले होते. एका आर्थिक गोष्टीसाठी हा दैरा होता. त्याआधी ते 2015 मध्ये मॉस्को दौऱ्यावर गेलेले. पुतिन आणि पीएम मोदी यांची शेवटची भेट सप्टेंबर 2022 मध्ये उज्बेकिस्तानच्या SCO शिखर सम्मेलनात झाली होती. पुतिन 2021 साली दिल्लीत आलेले. मागच्या दहा वर्षात दोन्ही नेत्यांनी 16 वेळा परस्परांची भेट घेतली आहे.

कोणाचा जळफळाट होईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियन दौरा रणनितीक दृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा आहे. त्याचवेळी पीएम मोदींच्या या दौऱ्याने अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांचा जळफळाट होऊ शकतो. कारण युक्रेन युद्धामुळे हे देश सातत्याने पुतिन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचवेळी मोदी मैत्री धर्म निभावणार.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.