COP26 Climate Summit | 2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जन शून्यावर, 2030 पर्यंत रेल्वेसमोर ‘नेट झिरो’चे लक्ष्य : मोदी
हवामानबदलासारख्या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COP26 परिषदेत संपूर्ण जगासमोर भारताची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी हवानबदलाची ही समस्या गंभीर असून सन 2070 पर्यंत भारतातील कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणले जाईल असे सांगितले.
ग्लासगो : हवामानबदलासारख्या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COP26 परिषदेत संपूर्ण जगासमोर भारताची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी हवानबदलाची ही समस्या गंभीर असून सन 2070 पर्यंत भारतातील कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणले जाईल असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारताच्या या भूमिकेचे जगभरात स्वागत होत आहे.
हवामान बदलाविषयी भारताचे विचार जगाला सांगितले
ब्रिटनमध्ये ग्लोसगो शहरात हवामानबदलांवर चर्चा करणारी COP26 ही परिषद सध्या सुरु झाली. 31 ऑक्टोबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत ही परिषद चालणार अून आज मोदी यांनी सभेला संबोंधित केलं. त्यांनी हवामान बदलाविषयी भारताचे काय विचार काय आहेत हे पूर्ण जगाला सांगितले. यावेळी अनेक देशांचे प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित आहेत.
मैं आज आपके सामने एक, वन वर्ड मूवमेंट का प्रस्ताव रखता हूं।यह एक शब्द क्लाइमेट के संदर्भ में एक विश्व का मूल आधार बन सकता है, अधिष्ठान बन सकता है। ये एक शब्द है- लाइफ… एल, आई, एफ, ई, यानि लाइफस्टाइल फॉर एनवायरनमेंट: PM मोदी (फोटो सौजन्य: DD) pic.twitter.com/a245HjV3Tf
— ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2021
COP26 बैठकीत मोदींनी काय सांगितलं ?
नरेंद्र मोदी यांनी कार्बंन उत्सर्जन कमी करण्याचे आश्वासन दिले. भारत 2070 पर्यंत शून्य कार्बनचे उद्दिष्ट गाठेल असे मोदी म्हणाले. तसेच मी आज येथे आलो आहे तर आज भारत देशाचे ट्रॅकरेकॉर्ड सांगतो. भारत आज रिन्यूएबल एनर्जी निर्मितीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. जगातील पूर्ण लोकसंख्येच्या अर्धे लोक भारतात वर्षभरात फक्त रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेने सन 2030 पर्यंत उत्सर्जनाच्या बाबतीत नेट झिरोवर येण्याचे लक्ष्य समोर ठेले आहे, असेही आश्वसन मोदी यांनी जगाला दिले.
क्लाइमेट चेंज पर इस वैश्विक मंथन के बीच, मैं भारत की ओर से, इस चुनौती से निपटने के लिए पांच अमृत तत्व रखना चाहता हूं, पंचामृत की सौगात देना चाहता हूं। पहला- भारत, 2030 तक अपनी गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता को 500 गीगावाट तक पहुंचाएगा: PM मोदी #COP26 pic.twitter.com/CruQv0L3Rv
— ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2021
उर्जासंबंधीच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करणार
भारत 2030 पर्यंत गैर-जीवाश्म ऊर्जेच्या क्षमतेला 500 गीगावॅटपर्यंत पोहोचवेल. 2030 पर्यंत भारत आपल्या उर्जासंबंधीच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल. भारत 2030 पर्यंत एकूण अंदाजित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करेल. तसेच भारत 2070 पर्यंत नेट झिरोचे लक्ष्य प्राप्त करेल, असे मोदी यांनी सांगितले.
इतर बातम्या :
UP Elections 2022: का अखिलेश यादव निवडणूक लढवणार नाहीत? काय आहे फॉर्म्युला?
चिंताजनक! जगातील सर्वाधिक हवा प्रदूषण दिल्लीमध्ये; लाहोर दुसऱ्या स्थानी
Jammu & Kashmir: NIA कडून आणखी दोन आरोपींना अटक; जम्मू-राजौरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला
(PM narendra modi speech in cop26 summit 2021 said india will achieve net zero carbon emissions by 2070)