PM Modi Ukraine Visit : पीएम मोदींच्या युद्घग्रस्त युक्रेन दौऱ्यात भारताचा फायदा काय?

PM Modi Ukraine Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या महिन्यात रशिया दौऱ्यावर गेले होते. या महिन्यात म्हणजे उद्याच मोदी युद्धग्रस्त पोलंडला भेट देणार आहेत. फक्त डिप्लोमसी एवढ्याच दृष्टीने मोदींच्या या दौऱ्याकडे पाहता येणार नाही. पीएम मोदींच्या या दौऱ्यामध्ये भारताचे अनेक फायदे सुद्धा आहेत, त्या बद्दल जाणून घेऊया.

PM Modi Ukraine Visit : पीएम मोदींच्या युद्घग्रस्त युक्रेन दौऱ्यात  भारताचा फायदा काय?
PM Narendra modi-volodymyr zelensky
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 3:10 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांच्या निमंत्रणावरुन 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पीएम मोदी आणि जेलेंस्की संरक्षण, आर्थिक संबंध आणि सायन्स-टेक्नोलॉजी सहकार्यावर चर्चा करु शकतात. भारताने रशियाकडून जी संरक्षण उपकरणं विकत घेतली आहेत, त्यातील बहुतेक उपकरण युक्रेनमध्ये बनवण्यात आली आहेत. यात अशी अनेक उपकरणं आहेत, ज्यांच अजून युक्रेनमध्ये निर्माण होतं. भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी गॅस टर्बाइन इंजिन आणि इंडियन एअर फोर्सच्या AN -32 विमानांचा यामध्ये समावेश होतो.

गॅस टर्बाइन इंजिन निर्मितीसंदर्भात युक्रेनची भारताच्या प्रायवेट कंपनीसोबत बोलणी सुरु आहे. काही वर्षांपूर्वी भारताने युक्रेनच्या STE सोबत मिळून 105 AN-32 विमानांचा ताफा अपग्रेड करण्यासाठी त्यांची लाइफ लाइन 40 वर्षापर्यंत वाढवण्यासाठी 400 मिलियन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या प्रोजेक्टला भरपूर विलंब झाला. AN-32 विमानांचा ताफा 2028-2029 पर्यंत अपग्रेड करण्याची इंडियन एअरफोर्सची योजना आहे. या एयरक्राफ्टमध्ये युक्रेन आणि रशियामध्ये निर्मिती झालेले इवचेंको AI-20DM इंजिन आहे. त्याशिवाय जोर्या-मशप्रोक्टवर 2022 मध्ये रशियाने मिसाइल हल्ला केला होता. युक्रेनच्या गॅस टरबाइन इंजिनवर अवलंबून असलेल्या भारताला याचा फटका बसला होता.

याआधी किती वेळा मोदी-जेलेंस्की भेट झालीय?

भारत आणि युक्रेन मिळून गॅस टर्बाइन इंजिन बनवण्यावर विचार करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये भारत-युक्रेनमध्ये परस्पर सहयोगाच्या दिशेने एक पाऊल असू शकतं. युक्रेन दौऱ्यावर पीएम मोदी राष्ट्रपती जेलेंस्कीची भेट घेतील. याआधी तीन वेळा ते जेलेंस्कीना भेटले आहेत. पीएम मोदी यांनी 8-9 जुलैला रशियाचा दौरा केला होता. 22 व्या भारत-रशिया वार्षिक सम्मेलनात रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.