अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारताचा डंका, पंतप्रधानांचं जंगी स्वागत, नरेंद्र मोदी यांचं साजूक भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मनापासून आभार मानले. जो बायडन यांनी भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान केल्याचं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारताचा डंका, पंतप्रधानांचं जंगी स्वागत, नरेंद्र मोदी यांचं साजूक भाषण
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 8:49 PM

वॉशिंग्टन डीसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ते आज वॉशिंग्टन डीसी येथे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीकडे दोन्ही देशांसह संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जो बायडन यांच्याकडून अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बायडन यांनी आपल्या भाषणात मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जो बायडन यांनी केलेल्या स्वागताबद्दल आभार मानले. तसेच द्विपक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा व्यक्त केली.

“मी भारतीय आणि अमेरिकेच्या नागरिकांना सर्वांना नमस्कार करतो. मी सर्वात आधी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मैत्रीपूर्ण स्वागत आणि दूरदृष्टीपूर्ण संबोधनासाठी त्यांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो. व्हाईट हाऊसमध्ये स्वागत समारंभ पार पडतोय, हा खरंतर 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. त्यांचा हा गौरव आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या 40 लाखांपेक्षा जास्त भारतीयांचा देखील हा सन्मान आहे. या सन्मानासाठी मी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“तीन दशकांपूर्वी एक सर्वसामान्य नागरिकाच्या रुपाने मी अमेरिकेत आलो होतो. त्यावेळी मी व्हाईट हाऊसला बाहेरुन पाहिलं होतं. भारताचा पंतप्रधान बनल्यानंतर मी स्वत: अनेकदा इथे आलो आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येत भारतीय-अमेरिकेच्या नागरिकांसाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे आज पहिल्यांदाच उघडण्यात आले आहेत”, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“भारतीय नागरीक आपलं ज्ञान, बुद्धिमता आणि निष्ठेने अमेरिकेत भारताची शान वाढवत आहेत. तुम्ही सर्व भारत-अमेरिका संबंधांचे खरी ताकद आहात. भारतीयांना दिलेल्या सन्मानाबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानतो. त्यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

“भारत आणि अमेरिका दोघांचे समाज आणि व्यवस्था हे लोकशाहीवर आधारीत आहे. दोन्ही देशांचे संविधानाचे पहिले तीन शब्द हे आम्ही भारताचे लोक असे आहेत. आपले दोन्ही देश हे आपल्या विविधतेवर गर्व बाळगतात”, असं मोदी म्हणाले.

“कोरोना काळानंतर जग एक नवं रुप धारण करत आहे. या कालखंडात भारत आणि अमेरिकेची मैत्री ही पूर्ण जगाच्या सार्थ्याला वाढवण्याच पूरक असेल. जगासाठी जागतिक शांती, स्थिरता आणि समृद्धीसाठी दोन्ही देश एकत्र मिळून काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमची मजबूत मैत्री ही लोकशाहीचं उदाहरण आहे”, असं मत नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

“आता काहीच वेळात बायडन आणि मी भारत-अमेरिका संबंध आणि इतर जागतिक मुद्द्यांवर विस्तारीत स्वरुपात बातचित करु. मला विश्वास आहे की, नेहमीप्रमाणे आजही आमची बातचित खूप सकारात्मक आणि उपयोगी राहील. मला आज दुपारी यूएस काँग्रेसला पुन्हा संबोधित करण्याची संधी मिळेल. या सम्मानासाठी मी आपला आभारी आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.