उपकारांची परतफेड, पोलंड सरकारचा भारतीय विद्यार्थ्यांना आसरा, दुसऱ्या महायुद्धावेळी काय घडलं होतं?

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine war) अजूनही थांबलेलं नाही.  या युद्धादरम्यान (Russian Attack) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थ्यांचा मुद्द्यावरुन भारतानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह युक्रेनसोबतही संपर्क केला आहे. मात्र, या संकटाच्या काळात पोलंडनं भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

उपकारांची परतफेड, पोलंड सरकारचा भारतीय विद्यार्थ्यांना आसरा, दुसऱ्या महायुद्धावेळी काय घडलं होतं?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 12:05 PM

कीव : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine war) अजूनही थांबलेलं नाही.  या युद्धादरम्यान (Russian Attack) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थ्यांचा मुद्द्यावरुन भारतानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Putin) यांच्यासह युक्रेनसोबतही संपर्क केला आहे. मात्र, या संकटाच्या काळात पोलंडनं भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकार पोलंडवरुन भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. संकटाच्या काळात पोलंड भारतासाठी धावून आल्यानं केंद्र सरकारनं पोलंडचे आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्यानं त्यांना सुरक्षित युक्रेनबाहेर काढणं ही भारताची प्राथमिकता आहे. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील दूतावास युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण, सध्या पोलंड भारताच्या मदतीसाठी धावून आल्यानं जगभरात सध्या दुसऱ्या महायुद्धातील भरताच्या पोलंडला केलेल्या मदतीची चर्चा रंगली आहे.

दुसऱ्या महायुद्धातील पोलंडची मदत

भारतानं दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या नागरिकांची मदत केली होती. पोलंडमधून भारतात आलेल्या अनाथांच्या मदतीसाठी भारत त्यावेळी रसावला होता. या अनाथांना इतर देशांनी मदत करण्यास नकार दिला होता. पण भारतानं पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला. आणि त्याची परतफेड पोलंडनं केल्याचं यावेळी म्हणलं तरी वावग ठरणार नाही. दुसऱ्या महायुद्धादरम्यान म्हणजेच 1941 साली पोलंडमधील नागरिक जगभरातील वेगवेगळ्या देशांकडे मदत मागत होते. जर्मनीनं पोलंडविरोधात युद्ध पुकारलं होतं. त्यावेळी ब्रिटनचंही पोलंडकडे विशेष लक्ष होतं.

अन् भारत पोलंडच्या मदतीला धावला

दुसऱ्या महायुद्धात पोलंडमधील बालके अनाथ झाली होती. यावेळी पोलंडच्या नागरिकांनी जगभरातील अनेक देशांकडे मदत मागीतली. पण, त्यावेळ अनेक देशांनी पोलंडमधील अनाथ बालकांना आपल्या देशात ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यावेळी इतर देशांच्या मनात अशी शंका होती. की,  पोलंडमधील नागरिकांना शरण दिल्यास किंवा त्यांना कोणतीही मदत केल्यास आपल्याही देशावर आक्रमण होईल. त्यामुळे अनेक देशांनी मदतीसाठी नकार दिला. यावेळी भारत मात्र पोलंडच्या मदतीसाठी धावून आला.

ब्रिटीशांचा नकार अन् राजाचा पुढाकार

भारतात त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. ब्रिटीशांना देखील पोलंडला मदत करण्यास त्यावेळी सपशेल नकार दिला होता. यावरुन त्यावेळी भारतात मोठा वाद झाला. या वादादरम्यान गुजरातमधील नवननगर आणि आता ज्याला जामनगर म्हणून ओळखतात. त्या नवननगरच्या राजानं पोलंडच्या नागरिकांची मदत करण्याचं ठरवलं. यासाठी नवननगरच्या राजांननी ब्रिटीशांसोबत पोलंडला मदत करण्याच्या मुद्द्यावरुन वाद घातला होता. नवननगरच्या राजांनी त्यावेळी पोलंडची मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यांना वैद्यकीय सुविधाही पुरवल्या होत्या. पोलंडनं भारतीय विद्यार्थ्यांच्या केलेल्या मदतीवरुन पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धातील पोलंडला भारतान केलेल्या मदतीच्या आठवणी ताज्या होतायेत.

संबंधित बातम्या

PHOTO | युक्रेन, हंगेरी, बुडापेस्टमधून अखेर विद्यार्थी औरंगाबादेत, 8 दिवस अखंड प्रवास, आई-बाबांच्या जीवात जीव

Russia Ukraine War Video: यूरोपातल्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे हल्ले, जगावरचं आण्विक संकट पुन्हा गडद, विनाशाच्या उंबरठ्यावर?

युक्रेनच्या सैन्याकडून 3 हजार भारतीयांसह अनेक परदेशी नागरीक कैद, व्लादिमीर पुतिन यांचं मोठ वक्तव्य

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.