नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी

नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडलीय. नेपाळचे प्रभारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) यांची कम्युनिस्ट पक्षाने हकालपट्टी केलीय.

नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 11:39 PM

Nepal Political Crises काठमांडू : नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडलीय. नेपाळचे प्रभारी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) यांची कम्युनिस्ट पक्षाने हकालपट्टी केलीय. त्यांना स्प्लिन्टर ग्रुपच्या मध्यवर्ती समितीने पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला. स्प्लिन्टर ग्रुपचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी याला दुजोरा दिलाय. तसेच ओली यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली (Political Crises in Nepal Communist Party remove K P Oli from Party).

नेपाळमध्ये सध्या मोठं राजकीय संकट आलंय. के. पी. ओली यांनी याआधीच संसद बरखास्त करण्याची शिफारस करत नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ज्ञावली म्हणाले, “आम्ही नेपाळच्या अंतर्गत विषयात बाहेरील कुणाच्याही हस्तक्षेपाला नाकारतो.” दुसरीकडे चीन नेपाळच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे.

नेपाळची संसद बरखास्तीचा प्रस्ताव

नेपाळ आपले प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे. यात दुसरं कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असं मत प्रदीप ज्ञावली यांनी व्यक्त केलं. के. पी. शर्मा ओली यांनी मागील काही दिवसांपूर्वी अचानक नेपाळची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. यानंतर चीनने हा प्रश्नात हस्तक्षेप करत त्यांच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री यांच्या नेतृत्वात नेपाळमध्ये एक प्रतिनिधी मंडळ नेपाळला पाठवलं.

चीनच्या प्रतिनिधी मंडळाच्या हाती निराशा

चीनच्या प्रतिनिधी मंडळाने नेपाळच्या प्रश्नात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हाती निराशाच आली. या मंडळाला कोणत्याही उपाययोजनेशिवायच मागे परतावं लागलं. विशेष म्हणजे चीनच्या या कृतीवर जागतिक स्तरावर टीकाही झाली. नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं होतं की भारत आणि नेपाळचे संबंध खूप चांगले आहेत. दोन्ही देशांच्या संबंधांची तुलना इतर कुणाशी करता येणार नाही. असं असलं तरी त्यांनी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या भूमिकेवर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

हेही वाचा :

नेपाळमध्ये सत्तासंघर्ष सुरु, माजी पंतप्रधान ‘प्रचंड’ पत्नीच्या उपचारासाठी मुंबईमध्ये येणार

आधार कार्ड दाखवून नेपाळींची भारतीय हद्दीत घुसखोरी, सुरक्षेसाठी धोक्याची घंटा

‘रॉ’चे प्रमुख नेपाळमध्ये; देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आणि पंतप्रधानांशी दोन तास गुप्त चर्चा

व्हिडीओ पाहा :

Political Crises in Nepal Communist Party remove K P Oli from Party

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.