मुलीच्या लग्नात रिकॉर्ड 550 कोटींचा खर्च, दिवस पालटताचा जावे लागले कारागृहात, आता पत्नी चालवतेय घर
Who is Pramod Mittal: लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल यांनी 2013 मध्ये त्यांची मुलगी सृष्टीशी लग्न केले. त्यावेळी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, बार्सिलोनामध्ये झालेल्या लग्नात 550 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
Who is Pramod Mittal: वेळ बदलण्यास जास्त दिवस लागत नाही. सुखामागून दु:ख आणि दु:खा मागून सुख येत असते. मुलीच्या लग्नात ५५० कोटी रुपये खर्च करणारा व्यक्ती एका झटक्यात दिवाळखोर झाला. त्यानंतर त्यांना कारागृहात जावे लागले होते. आता त्यांचा घरखर्चाची जबाबदारी पत्नी सांभाळत आहे. हा प्रकार जगभरातील अब्जाधिशांमध्ये समावेश असलेल्या प्रमोद मित्तल यांच्या बाबत घडला आहे. अब्जाधीश उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे ते भाऊ आहेत. काही वर्षांपूर्वी 24000 कोटी रुपये कर्ज झाल्यानंतर ते दिवाळखोर झाले. आता ते काय करत आहेत किंवा त्यांच्यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही.
कोण आहे प्रमोद मित्तल
स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल याचे लहान भाऊ प्रमोद मित्तल इंग्लंडच्या श्रीमंताच्या यादीत होते. परंतु 68 वर्षाचे प्रमोद मित्तल 2020 मध्ये कर्जबाजारी झाले. लंडनमधील न्यायालयाने 130 मिलियन पाउंड (24000 कोटी रुपये) कर्जामुळे त्यांना दिवाळखोर जाहीर केले.
पत्नी चालवतेय घरखर्च
प्रमोद मित्तल यांचे स्वत:चे काही उत्पन्न नाही. पत्नी परिवाराचे घरखर्च चालवत आहे. 2,000 ते 3,000 पाउंड महिन्याचा खर्च पत्नी करत आहेत. 2019 मध्ये प्रमोद मित्तल यांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर भारतातील स्टेट ट्रेडिंग कॉरपोरेशन (STC) सोबत 2,200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मनी लॅण्ड्रींगचाही तपास सुरु आहे.
मुलीच्या लग्नात 550 कोटी रुपये खर्च
लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल यांनी 2013 मध्ये त्यांची मुलगी सृष्टीशी लग्न केले. त्यावेळी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, बार्सिलोनामध्ये झालेल्या लग्नात 550 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मुलगी सृष्टी हिचे लग्न डच वंशाचे गुंतवणूक बँकर गुलराज बहल यांच्याशी झाले आहे. विशेष म्हणजे प्रमोद मित्तल यांनी त्यांचे मोठे भाऊ लक्ष्मी मित्तल यांनी आपल्या मुलीच्या लग्नावर जेवढा खर्च केला त्यापेक्षा 10 मिलियन पौंड जास्त खर्च केला होता. लक्ष्मी मित्तल यांच्या मुलीचे 2004 साली लग्न झाले होते.