नोकरी हवी तर गर्भावस्था चाचणी करा, कंपन्यांनी सुरु केला हा फंडा अन्…
चीनमधील जियांग्सू प्रांतात टोंगझोऊ येथील 16 कंपन्याविरोधात आंदोलन उभारले आहे. या कंपन्यांनी नोकरीसाठी आलेल्या महिलांची बेकायदेशीरपणे प्रेग्नेंसी टेस्ट केल्याचे म्हटले आहे. या कंपन्यांनी माहिलांच्या रोजगाराच्या संधीच्या हक्कावर गदा आणली आहे.
चांगल्या कंपनीत नोकरी मिळवणे सोपे नसते. त्या नोकरीसाठी विविध पातळीवर परीक्षा आणि मुलाखतीतून जावे लागते. त्यानंतर त्या पातळ्यांमधून निवड झाल्यावर एचआर विभागाशी चर्चा होते. त्यात यश आल्यावर नोकरीचे ऑफर लेटर मिळते. परंतु चीनमधील कंपन्यांनी वेगळाच प्रकार सुरु केला आहे. चीनमध्ये नोकरी मिळवण्यासाठी गर्भावस्था चाचणी करावी लागत आहे. त्यामुळे चीनमधील 16 कंपन्यांविरोधात खटला दाखल केला आहे. त्या खटल्यात या कंपन्यांनी नोकरीच्या अर्ज करणाऱ्या कंपन्यांनी प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
बेकायदेशीरपणे काम
ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाइटवर दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, चीनीमधील कायद्यानुसार कोणत्या महिलेची नियुक्ती करताना तिची प्रेग्नेंसी टेस्ट करता येणार नाही. परंतु त्यानंतरही काही कंपन्या महिलांची गर्भावस्था चाचणी करत आहे. कारण गर्भावती महिलांना त्यांना मातृत्वाची सुटी द्यावी लागतो. या काळात त्यांना पगारही द्यावा लागतो. यामुळे काही कंपन्या आपले नुकसान होत असल्याचे म्हणतात.
प्रेग्नेंट असल्यामुळे केले होते रिजेक्ट
चीनमधील जियांग्सू प्रांतात टोंगझोऊ येथील 16 कंपन्याविरोधात आंदोलन उभारले आहे. या कंपन्यांनी नोकरीसाठी आलेल्या महिलांची बेकायदेशीरपणे प्रेग्नेंसी टेस्ट केल्याचे म्हटले आहे. या कंपन्यांनी माहिलांच्या रोजगाराच्या संधीच्या हक्कावर गदा आणली आहे. अर्ज केलेली एक महिला गर्भवती होती. तिला गर्भवती असल्यामुळे कंपनीने रिजेक्ट केला. हे समजल्यावर त्या महिलेस हा धक्का बसला. त्यात तिचा मृत्यू झाला.
चौकशीत 16 कंपन्या आढळल्या दोषी
रिपोर्ट्सनुसार, वकिलांना या कंपन्यांसंदर्भात निनावी तक्रार मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गुप्तपणे चौकशी सुरु करण्यात आली. शेवटी 16 कंपन्या चौकशीत दोषी आढळल्या. या कंपन्यांनी महिलांना बेकायदेशीरपणे गर्भवतीपणाची चाचणी करायला लावली. या प्रकरणात एक रुग्णालयाचा सहभाग आढळून आला. त्या ठिकाणी एकूण 168 महिलांची गर्भावस्था चाचणी केली होती. अनेक महिलांना यासंदर्भात कोणतीही लेखी सूचना दिली नव्हती. केवळ मौखिक पद्धतीने संकेत दिले होते.