पंतप्रधान मोदी आता या मुस्लीम देशाच्या दौऱ्यावर जाणार, चीनची तिरकी नजर
तेल आणि वायूचा प्रचंड साठा असल्यामुळे या देशाला आफ्रिकेचा सौदी अरेबिया म्हटले जाते. पंतप्रधान मोदी आता या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ज्याकडे चीनचं बारीक लक्ष आहे. हा आफ्रिकन खंडातील सर्वोच्च अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देशातील तेल आणि वायूचे साठे येथे वाढत आहेत, त्यामुळे चीननेही येथे आधीच लक्ष ठेवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16-17 नोव्हेंबरला नायजेरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 17 वर्षानंतर कोणता भारतीय पंतप्रधान हा या आफ्रिकन देशाला भेट देणार आहे. त्यामुळे याकडे महत्त्वाची राजनैतिक घटना म्हणून पाहिले जात आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींचा हा दौरा होत आहे. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील तसेच भारत आणि नायजेरिया यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. नायजेरिया आणि भारताचे सहा दशकांहून अधिक काळ संबंध आहेत. परंतु चीनही या देशासोबच मैत्री वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असतो.
नायजेरियाला 1960 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. अनेक दशकांमध्ये, संबंध राजकीय देवाणघेवाण पासून शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकसित झाले आहेत.
आफ्रिकेतील सौदी अरेबिया
तेल आणि वायूच्या प्रचंड साठ्यामुळे नायजेरियाला आफ्रिकेतील सौदी अरेबिया देखील म्हटले जाते. या नैसर्गिक साठ्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. नायजेरिया हा आफ्रिकेतील खूप मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. 22 कोटी लोकसंख्या असलेला देश जीडीपीच्या बाबतीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताप्रमाणेच नायजेरिया हा बहु-जातीय आणि बहुभाषिक देश आहे. समान लोकशाही मूल्येा या देशात जपली जातात.
तेल आणि वायूच्या साठ्यांवर चीनची नजर
चीनने काही काळापासून नायजेरियासोबत संबंध वाढवले आहेत. त्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. कारण चीनचा अफाट तेल आणि वायू साठ्यांवर लक्ष आहे. नायजेरियन सरकारच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2024 पर्यंत कच्चे तेल आणि कंडेन्सेटचा एकत्रित साठा 37.5 अब्ज बॅरल्सपर्यंत वाढला आहे.
असोसिएटेड आणि नॉन असोसिएटेड गॅसच्या साठ्यातही येथे वाढ झाली आहे. जो आता 209.26 ट्रिलियन घनफूट झाला आहे. हे आकडे नायजेरियातील महत्त्वपूर्ण तेल आणि वायू संसाधने हायलाइट करतात आणि जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून स्थान देतात.