आधी झेलेन्स्कींशी बोलले नंतर पुतिनशी, मोदींनी रशिया-युक्रेन युद्धात नेमका काय तोडगा सांगितला?

युक्रेनमध्ये अजूनही जवळपास 700 भारतीय विद्यार्थी अडकल्याचे समजते. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शाखेचे असून, ते सुमी शहरात आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे एक दिलासादायक गोष्ट म्हणजे रशियाने चार शहरांमध्ये तूर्तास तरी युद्ध थांबल्याची घोषणा केली आहे.

आधी झेलेन्स्कींशी बोलले नंतर पुतिनशी, मोदींनी रशिया-युक्रेन युद्धात नेमका काय तोडगा सांगितला?
नरेंद्र मोदी यांनी आज झेलेन्स्की आणि पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 5:03 PM

नवी दिल्लीः रशिया आणि युक्रेनमधले युद्ध थांबायाचे नाव घेत नाही. आज युद्धाचा 12 वा दिवस आहे. मात्र, घनघोर धुमश्चक्री सुरूय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Zelensky) यांच्यात फोनवरून 35 मिनिटेच चर्चा झाल्याचे समजते. यावेळी झेलेन्स्की यांनी रशियन आक्रमणाचा आम्ही कसा प्रतिकार करत आहोत, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मोदींनी पुतिन (Putin) यांच्याशी 50 मिनिटे चर्चा केली. सध्या भारतातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्याची वेळ द्यावी. त्या दरम्यान दोन्ही देशांनी युद्ध थांबवावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत.

झेलेन्स्कींसोबत काय झाली चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी सकाळी साडेअकरा वाजता फोनवरून संवाद साधला. जवळपास पस्तीस मिनिटे ही चर्चा झाल्याचे समजते. यावेळी झेलेन्स्की यांनी युद्धाची सारी माहिती मोदी यांना दिली. यावेळी मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले. शिवाय युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक बाहेर काढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन झेलेन्स्की यांना केले. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी युक्रेनचे आभारही मानल्याचे समजते.

पुतिन यांच्याशी काय झाली चर्चा?

झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशीही चर्चा केली. यावेळी मोदी यांनी पुतिन यांना झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करण्याचे आवाहन केले. शिवाय पुतिन यांनी यावेळी सुमी शहरात अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढून घेण्यासाठी मदतीचे आश्वासन दिल्याचे समजते. मोदींनी दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या चर्चेचेही यावेळी स्वागत केले.

सध्या कोणत्या 4 शहरात युद्ध थांबले?

युक्रेनमध्ये अजूनही जवळपास 700 भारतीय विद्यार्थी अडकल्याचे समजते. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शाखेचे असून, ते सुमी शहरात आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे एक दिलासादायक गोष्ट म्हणजे रशियाने चार शहरांमध्ये तूर्तास तरी युद्ध थांबल्याची घोषणा केली आहे. त्यात कीव्ह, मारियूपोल, खारकीव आणि सुमीचा समावेश आहे. हा युद्धाची सर्वात जास्त झळ पोहचलेला भाग आहे. येथून बाहेर पडण्याची संधीच मिळत नव्हती. या घोषणेनंतर येथील भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येत आहे.

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.