ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि चीनला सुनावले, प्रकरण काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आधीपासूनच तणावपूर्ण राहिलेले आहेत. भारत पाकिस्तानातील दहशतवादावर नेहमीच आपली रोखठोक भूमिका मांडत असतो. आता भारताने चीन आणि रशियाच्या प्रमुखांना सुनावले आहे. काय म्हणाले पंतप्रधान मोदी जाणून घ्या.

ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि चीनला सुनावले, प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 8:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. या दरम्यान बोलताना त्यांनी रशिया आणि चीन दोन्ही देशांना सुनावले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, ब्रिक्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ब्रिक्सच्या विस्ताराबाबत कोणताही निर्णय सर्वसहमतीने घ्यावा, असेही ते म्हणाले. पाकिस्तान आणि तुर्कियासह सुमारे 30 देश ब्रिक्सचे सदस्य होण्यास इच्छुक आहेत. पाकिस्तानला रशिया आणि चीनचा पाठिंबा आहे. मात्र सहमतीनेच ब्रिक्सचा विस्तार होईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.

ब्रिक्समधील भागीदार देश म्हणून भारत नवीन देशांचे स्वागत करण्यास तयार आहे. मोदी म्हणालेकी, ‘यासंदर्भातील सर्व निर्णय एकमताने घेतले जावेत. ब्रिक्स संस्थापक सदस्यांच्या विचारांचा आदर केला जावा.’ रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.

पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 30 देश ब्रिक्समध्ये सहभागी होऊ इच्छिच आहेत. भारत, ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्सचे सर्वात जुने सदस्य आहेत. तर इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती हे गेल्या वर्षी नवीन सदस्य म्हणून सामील झाले आहेत.

पाकिस्तानला जर ब्रिक्समध्ये सामील व्हायचे असेल तर त्यासाठी भारताची सहमती असणं गरजेचं आहे. भारताचा पाकिस्तानला विरोध आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, रशियाशी चर्चा आणि भारत आणि चीनमधील तणाव कमी झाल्यामुळे हे घडत आहे. पाकिस्तानने ऑगस्ट २०२३ मध्ये ब्रिक्सचे सदस्य होण्यासाठी अर्ज केला होता. सुरुवातीला भारताकडून विरोध झाला होता. मात्र रशियाने पाकिस्तानला साथ दिली.

सप्टेंबर 2023 मध्ये, रशियन डेप्युटी पीएम ॲलेक्सी ओव्हरचुक यांनी सार्वजनिकपणे पाकिस्तानच्या BRICS मध्ये समावेशाला पाठिंबा दिला होता. कझान येथे होणाऱ्या शिखर परिषदेत भारताच्या मवाळ भूमिकेवर चर्चा होत आहे. अहवालात म्हटले आहे की पुतिन आणि पीएम मोदी यांच्या भेटीनंतर, भारत आपला विरोध कमी करू शकतो, ज्यामध्ये रशिया मध्यस्थी करेल अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.