हमास विरुद्ध युद्ध सुरु असतानाच आता इस्रायलच्या पंतप्रधानांचा या देशाला थेट इशारा

Israel-Hamas war : इस्रायल हा चारही बाजुने शत्रूंशी वेढलेला देश आहे. सर्व अरब देश हे इस्रायलच्या विरोधात आहेत. अनेक वर्षांपासूनची ही लढाई आजही कायम आहे. यात इस्रायलने आता आणखी एका देशाला थेट आव्हान दिले आहे. कोणता आहे तो देश जो आगीत तेल टाकण्याचं काम करतोय.

हमास विरुद्ध युद्ध सुरु असतानाच आता इस्रायलच्या पंतप्रधानांचा या देशाला थेट इशारा
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 8:29 PM

Israel vs Iran : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला स्पष्ट शब्दात इशारा देऊन टाकला आहे. इराणसोबतच हिजबुल्लाला देखील इस्रायलच्या पंतप्रधानांनी आव्हान दिले आहे. आमची परीक्षा’ घेऊ नका अशा शब्दात त्यांनी कडक इशारा दिला आहे. हमास सारख्या दहशतवादी संघटनेला पराभूत करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज आहे असे देखील बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायली संसदेतील ‘नेसेट’मधील भाषणात म्हटले आहे.

“हे तुमचेही युद्ध आहे.”

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमास या दहशतवादी गटांविरुद्ध इस्रायलचे सुरू असलेले युद्ध हा अंधारा विरुद्ध अस्तित्वाचा लढा आहे. 75 वर्षांनंतरही स्वातंत्र्याची लढाई संपलेली नाही. इराण हा आगीत तेल ओतत असल्याचं देखील इस्रायलने म्हटले आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन जगाला केले आहे. हे युद्ध आमचे युद्ध नाही तर तुमचेही युद्ध आहे. जर आपण एकत्र आले नाही तर उद्या तुमच्यासोबत ही हे घडेल. आम्ही जिंकू, कारण येथे आमचे अस्तित्व धोक्यात आहे. त्यांनी हमासची तुलना नाझी जर्मनीशी केली.

हमासवर विजय हेच आमचे ध्येय – इस्रायल

पीएम बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, “हमासवर विजय मिळवणे हे आमचे ध्येय आहे.” 7 ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला होता. ज्यामध्ये इस्रायलचे अनेक नागरिक मारले गेले होते. ज्यामध्ये काही परदेशी पर्यटकांचा देखील समावेश होता. 4000 लोकं जखमी झाले आहेत, तर सुमारे 200 ओलिसांचे अपहरण करून गाझा पट्टीमध्ये कैदेत ठेवले आहे.

गाझामध्ये मृत्यूंची संख्या 2,670 वर गेली आहे. 9,600 हून अधिक जखमी झाले आहेत. गेल्या 24 तासांत गाझामध्ये 455 लोकांचा मृत्यू झाला असून 856 लोक जखमी झाले आहेत.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...