6 लग्न आणि 30 मुलं, शेवटची राणी घाबरुन लंडनला पळाली, पोटच्या पोरीला कैद करणाऱ्या दुबईच्या राजाची क्रूर कहाणी
दुबईचे राजा शेख मोहम्मद अल मख्तूम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत (Princess Sheikh Latifa video viral)
दुबई (यूएई) : दुबईचे राजा शेख मोहम्मद अल मख्तूम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचं यावेळी चर्चेत येण्यामागील कारण थोडंसं वेगळं आणि विचित्र आहे. त्यांची मुलगी प्रिन्सेस शेख लतिफा हीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लतिफाने आपल्या वडिलांनी आपल्याला बंदी केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे लतिफा गेल्या काही वर्षांपासून बेपत्ता होती. त्यानंतर अचानक तिचा व्हिडीओ समोर आल्याने दुबईत मोठी खळबळ उडाली आहे (Princess Sheikh Latifa video viral).
“मला वडील अल मख्तूम यांनी कैद केलं आहे. मी खुल्या हवेत श्वासदेखील घेऊ शकत नाही. याशिवाय कोणतीही मेडिकल सुविधा मला मिळत नाही. या परिस्थितीत मी जिवंत राहील की नाही, हे मला कळत नाही”, असं लतिफा व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. लतिफाने तो व्हिडीओ एका टॉयलेटमध्ये शूट केला आहे. तशी माहिती ती स्वत: व्हिडीओमध्ये देत आहे. हा व्हिडीओ जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
अल मख्तूम यांच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातील अनेकांनी त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुबई आज व्यापार आणि पर्यटनात चांगल्या प्रगतीपथावर आहे. याचं श्रेय अल मख्तूम यांनाच जातं. मात्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य फार वादग्रस्त राहीलं आहे. त्यांनी आतापर्यंत सहा लग्न केले आहेत. या सहा पत्नींकडून त्यांना 30 मुलं आहेत. याशिवाय त्यांचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याची चर्चा आहे. त्यांनी आपल्या पोटच्या मुलीलाच कैद केल्याची चर्चा गेल्या काही वर्षाांपासून दुबईत दबक्या आवाजात सुरु होती. पण आता त्या मुलीचाच व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
जो माणूस आपल्या पोटच्या मुलीला कैद करु शकतो तो माणूस कोणत्याही थरावर पोहोचू शकतो, असा विचार अल मख्तूर यांची शेवटची पत्नी बिन्त-अल हुसैन यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी दुबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला. हुसैन 15 अप्रिल 2019 रोजी आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळून जाण्यात यशस्वी ठरल्या (Princess Sheikh Latifa video viral).
अल मख्तूम यांचा आतापर्यंतचा प्रवास
शेख मोहम्मद अल मख्तूम यांचा जन्म 1949 मध्ये झाला. ते शिक्षणासाठी कॅब्रिज विद्यापीठात गेले होते. 1971 साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल मख्तूम यांना संयुक्त अरब अमीरातीचा संरक्षण मंत्री बनवण्यात आलं. विशेष म्हणजे त्या पदावर ते अद्यापही कार्यरत आहेत. त्यांनी देशासाठी चांगली कामं केली.
पूर्वी यूएई देश फक्त तेल निर्यातीवर अवलंबून होता. पण यूएईची अर्थव्यवस्था फक्त तेलवर अवलंबून राहू नये, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी अल मख्तूम यांनी योजना आखली. पुढे या योजनेला अंमलात आणलं गेलं. त्यामुळे यूएईची 95 टक्के अर्थव्यवस्था ही कच्चा तेल व्यतिरिक्त पर्यटन आणि व्यापारावर अवलंबून आहे.
शेख यांनी देशाच्या विकासासाठी केलेलं काम उल्लेखणीय आहे. मात्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड वादग्रस्त राहीले आहे. त्यांचे डझनभर महिलांशी अनैतिक संबंध आहेत. त्यांनी 2004 साली वयाच्या 55 व्या वर्षी 25 वर्षाची तरुणी बिन्त-अल हुसैन यांच्याशी लग्न केलं. विशेष म्हणजे हे त्यांचं सहावं लग्न होतं. हया या जॉर्डनच्या माजी राजाच्या कन्या होत्या. हया यांना घोडेस्वारीच्या छंद होता. त्यांनी ऑलम्पिकमध्येही सहभाग घेतला होता.
हया यांचा पती अल मख्तूम यांच्यासोबत चांगला संसार सुरु होता. मात्र, 2018 मध्ये मख्तूम यांनी पोटच्या मुलीला कैद केल्याची बातमी त्यांना कळाली. या बातमीने त्या हादरल्याच. त्यामुळे भेदरलेल्या हया यांनी तातडीने आपल्या मुलांना घेऊन दुबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
आणखी एक मुलगी कैद
अल मख्तूम यांनी त्यांची मुलगी लतिफा हीला कैद केल्याचं वृत समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मख्तूम यांनी लतिफाची मोठी बहीण शम्सा हीलादेखील कैद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती इंग्लंडला पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. तरीदेखील मख्तूम यांच्या माणसांनी तिला शोधून काढलं होतं. त्यांनी तिला बेशुद्धीचं इंजेक्शन देवून दुबईत आणलं होतं. त्यानंतर मख्तूम यांनी लतिफाला कैद केलं. तिने 2002 साली पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा तिचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यावेळी तिला तीन वर्ष कैदची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 2018 साली तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हाही ती अयशस्वी ठरली.
हेही वाचा : पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम, अनेक अनुत्तरीत प्रश्न