इस्रायलमध्ये संतापाचे वातावरण, लोकं उतरली रस्त्यावर; पंतप्रधान नेतन्याहू यांची खूर्ची धोक्यात, कारण काय?

गाझामध्ये 6 इस्राईली लोकांची हत्या केल्यामुळे इस्रायलचे लोकं रस्त्यावर उतरले आहेत. या ओलिसांच्या हत्येविरोधात इस्रायलमधील बेंजामिन नेतन्याहू सरकारच्या विरोधात लोकं तीव्र संताप व्यक्त करत आहेत. लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत.

इस्रायलमध्ये संतापाचे वातावरण, लोकं उतरली रस्त्यावर; पंतप्रधान नेतन्याहू यांची खूर्ची धोक्यात, कारण काय?
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 8:58 PM

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हमासने गाझा पट्टीत 6 इस्रायली लोकांना ठार केले आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये संतापाची लाट पसरली आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने गाझा पट्टीतून सहा मृत इस्रायली व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनंतर देशात निदर्शने सुरू झाली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ४८ ते ७२ तास आधी या ओलिसांची हत्या करण्यात आल्याची माहित आहे.

शवविच्छेदन करणाऱ्या फॉरेन्सिक इन्स्टिट्यूटने उघड केले की त्याच्यावर जवळून अनेक वेळा गोळ्या झाडण्यात आल्यात. हमासच्या अतिरेक्यांनी क्रूरपणे त्यांची हत्या केली. शनिवारी दुपारी त्यांचे मृतदेह इस्रायली सैनिकांना आढळले.

हमासचे नेते खलील अल-हय्या यांनी ओलीसांच्या मृत्यूसाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना जबाबदार धरले आहे. “नेतन्याहू आणि त्यांचे अतिरेकी सरकार हे ओलीसांच्या मृत्यूचे कारण आहे.” असे अल हय्या यांनी म्हटलंय. 7 ऑक्टोबर रोजी हमासने पकडलेल्या 251 लोकांपैकी 97 अजूनही गाझामध्ये असल्याचे मानले जाते, तर IDF ने आतापर्यंत 33 मृत्यूची पुष्टी केली आहे.

रविवारी, तेल अवीव, जेरुसलेम आणि इतर शहरांमध्ये निदर्शनं केली. इस्रायली लोकांच्या हत्येचा त्यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि प्रशासनाविरुद्ध राग व्यक्त केला. 7 ऑक्टोबरला हल्ल्यादरम्यान हमासने ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी करार करण्याची अट ठेवली होती. जी सरकारने अमान्य केली होती.

युद्धविराम करारावर पोहोचण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात हिस्ताद्रुत कामगार संघटनेचे नेते अर्नॉन बार-डेव्हिड यांनी सोमवारी राष्ट्रीय संपाची घोषणा केली. अमेरिका आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अंतिम युद्धविराम करारानुसार मृत ओलीसांपैकी काहींची सुटका केली जाईल.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. याआधी त्यांनी इराणमध्ये हमास प्रमुखाला देखील ठार केले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.