Vladimir Putin : पुतीन यांचे राईट हँड, युक्रेन युद्धाच्या मास्टरमाइंडच्या मुलीची हत्या; कारमध्ये बॉम्ब ठेवून उडवले
Vladimir Putin : रस्त्याच्या मधोमध हा स्फोट झाला. आधी स्फोटाचा जोरदार आवाज झाला. त्यानंतर स्फोट होताच आगीचे लोळ उठले. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. स्फोट झाल्यानंतर या हायवेवरील वाहतूक थांबली.
मास्को: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना एक मोठा झटका बसला आहे. पुतीन यांचे राईट हँड तसेच युक्रेन युद्धाचे मास्टरमाइंड अलेक्झांडर डुगिन (Aleksandr Dugin) यांची मुलगी डारिया डुगिन (Darya Dugina) हिची हत्या करण्यात आली आहे. डारिया तिच्या लँड क्रुझर कारने जात असताना कारमध्ये बॉम्बस्फोट होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. ओडिंत्सोव्हस्की जिल्ह्यातील मोझायस्कोये हायवेवर हा भीषण स्फोट झाला. विशेष म्हणजे, अलेक्झांडर डुगिन यांचीच हत्या करण्याचा प्रयत्न होता. रशियन मीडियानुसार, ज्या कारमध्ये बॉम्ब स्फोट झाला. त्या कारमधून डुगिन जाणार होते. पण त्यांनी ऐनवेळी कारमध्ये बसण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची मुलगी या कारने गेली अन् बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट प्रचंड भीषण होता. बॉम्बस्फोट होताच दारिया डुगिनच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डुगिन हे रशियन राष्ट्रपतींचे मेंदू म्हणून ओळखले जातात.
युक्रेनमधील दहशतवाद्यांनी हा कार ब्लास्ट घडवून आणल्याचा दावा डोनेस्क रिजनचे कमांडर डेनिस पुशलिन यांनी केला आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी दोन दिवसांपूर्वीच रशियाला इशारा दिला होता. जेपोरिजिया प्लांट खाली करण्यासाठी ही धमकी देण्यात आली होती. हा प्लांट खाली केला नाही तर त्याचे परिणाम वाईट होईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Reports say the daughter of Aleksandr Dugin—the man nicknamed “Putin’s brain” who was behind the annexation of Crimea and the invasion of Ukraine—was killed in a car explosion in Moscow tonight.pic.twitter.com/9iLS21OLZ6
— Alex Salvi (@alexsalvinews) August 20, 2022
रस्त्याच्या मधोमध कार स्फोट
रस्त्याच्या मधोमध हा स्फोट झाला. आधी स्फोटाचा जोरदार आवाज झाला. त्यानंतर स्फोट होताच आगीचे लोळ उठले. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. स्फोट झाल्यानंतर या हायवेवरील वाहतूक थांबली. लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. या स्फोटानंतर डुगिन आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्फोटात कारचे पार्ट उडाले. कारचे पार्ट अस्तव्यस्त पडले होते. क्रिमिया आणि युक्रेनमधील रशियन सैन्याच्या अभियानाच्या मागे डुगिन यांचेच डोके असल्याचं सांगितलं जात आहे. ब्रिटननेही प्रतिबंधितांच्या यादीत डुगिन यांच्या नावाचा समावेश केला होता.
लेखिका आणि सल्लागार
डारिया ही लेखिका होती. ती डुगिन यांची सल्लागारही होती. तर डुगिन हे राजकीय विश्लेषक आहेत. क्रिमिया आणि युक्रेन युद्धामागे त्यांचाच हात असल्याचं सांगितलं जातं. तसेच त्यांना पुतीन यांचा मेंदू म्हणूनही ओळखलं जातं.