‘कोरोना’वर लस शोधण्यात रशियाची आघाडी, पुतीन यांची घोषणा
कोरोना व्हायरसवरील रशियाची पहिली लस गॅमलेया संशोधन संस्था आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे विकसित केली आहे.
मॉस्को : ‘कोरोना’वर लस शोधण्याचे जगभर प्रयत्न सुरु असताना रशियाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. ‘कोविड19’ वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यासंदर्भात घोषणा केली. (Putin says Russia has approved world’s first corona virus vaccine for use)
कोरोना व्हायरसवरील रशियाची पहिली लस गॅमलेया संशोधन संस्था (Gamaleya Research Institute) आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे विकसित केली आहे.
या लसीच्या वैद्यकीय चाचण्या 18 जून रोजी सुरु करण्यात आल्या होत्या. चाचणीत सहभागी झालेल्या सर्व 38 स्वयंसेवकांनी प्रतिकारशक्ती विकसित केल्याची माहिती आहे.
‘कोविड19’ वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे, असे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी एका सरकारी बैठकीत जाहीर केले. पुतीन यांच्या कन्येनेही ही लस घेतल्याची माहिती आहे.
पुतीन यांनी आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांना या लसीबद्दल माहिती देण्यास सांगितले. ही लस “प्रभावी ठरते” आणि “स्थिर प्रतिकार शक्ती (stable immunity) निर्माण करते” असा दावाही पुतीन यांनी केला.
#BREAKING Russia has developed ‘first’ coronavirus vaccine: Putin pic.twitter.com/s33LTMO0j0
— AFP news agency (@AFP) August 11, 2020
पुतीन यांनी पुढे कोरोनावरील पहिल्या लसीवर काम केलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. जगासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Putin says Russia has approved world’s first corona virus vaccine for use)