India Qatar Realtions | कूटनीतीचा विजय, आठ माजी भारतीय नौसैनिकांबद्दल कतारचा खूप मोठा निर्णय

India Qatar Realtions | अल दहरा ग्लोबल कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक झाली होती. त्यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

India Qatar Realtions | कूटनीतीचा विजय, आठ माजी भारतीय नौसैनिकांबद्दल कतारचा खूप मोठा निर्णय
Qatar frees eight Navy veterans
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 8:15 AM

India Qatar Realtions | भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा कूटनीतिक विजय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी कतारमध्ये आठ माजी भारतीय नौसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर कथित हेरगिरीचा आरोप होता. कतारच्या कोर्टाने या आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. पुढे भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर ही मृत्यूदंडाची शिक्षा बदलून तुरुंगवास करण्यात आला. आता त्यापुढे जात कतारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत आणि कतारमधील राजकीय संबंध अधिक दृढ होणार आहेत. कतारने या आठ भारतीय नौसैनिकांची सुटका केली आहे. भारताने कतारच्या या निर्णयाच स्वागत केलं आहे. आठ पैकी सात भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत, अशी माहिती नवी दिल्लीतून देण्यात आली आहे. भारताचा हा मोठा कूटनीतिक विजय आहे.

दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेच भारत सरकारने स्वागत केलय. आठ पैकी सात जण भारतात परतले आहेत. कतारचे राजे अमीर यांच्या निर्णयाच आम्ही स्वागत करतो, असं भारत सरकारने म्हटलय. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात कतारच्या एका कोर्टाने अल दहरा ग्लोबल प्रकरणात अटकेत असलेल्या भारतीय नागरिकांची मृत्यूदंडाची शिक्षा बदलली होती. ही शिक्षा तुरुंगवासात बदलली होती. भारत सरकारने मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात कतारच्या कोर्टात अपील केलं होतं. ते मान्य करण्यात आल्यानंतर हा निर्णय झाला होता.

कतारच्या ताब्यात कुठले भारतीय अधिकारी होते?

कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदु तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश हे आठ जण कतारच्या ताब्यात होते.

प्रकरण काय आहे?

अल दहरा कंपनीत भारती नौदलाचे हे आठ माजी अधिकारी काम करत होते. हेरगिरीच्या कथित प्रकरणात ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेऊन कतारचे अधिकारी आणि नवी दिल्लीने सुद्धा आरोप सार्वजनिक केले नाहीत. 26 ऑक्टोबर 2023 रोजी कतारच्या कोर्टाने या माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. भारताने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. कतारमधील कोर्टाने हा निर्णय घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा विषय महत्त्वाच असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करणार असल्याच म्हटलं होतं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.