Quad Summit in Tokyo : पंतप्रधान मोदी म्हणाले- क्वाड ग्रुपने अल्पावधीतच जागतिक स्तरावर आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले
टोकियो, जपान येथे क्वाड लीडर्स समिटमध्ये मोदींनी चीनच्या आक्रमक वृत्तीला चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, क्वाड स्तरावर चार देशांच्या परस्पर सहकार्याने मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक प्रदेशाला प्रोत्साहन दिले जात आहे. हे आपल्या सर्वांचे समान ध्येय आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी क्वाड समिटमध्ये (Quad Summit) भाग घेतला. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते. क्वाड बैठकीत भारताचे पंतप्रधान म्हणाले की, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांचा परस्पर विश्वास आणि दृढनिश्चय लोकशाही शक्तींना नवी ऊर्जा देत आहे. क्वाड लीडर्स समिटच्या (Quad Leaders Summit)आधी उद्घाटनाच्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, ‘क्वाड ग्रुपने फार कमी वेळात जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.’
Quad has made an important place for itself before the world in such a short span of time. Today, Quad’s scope has become extensive, its form effective. Our mutual trust, and our determination is giving new energy & enthusiasm to democratic powers: PM Modi at Quad Leaders’ Summit pic.twitter.com/MIa5UlUp8K
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 24, 2022
तसेच ते म्हणाले, ‘आज क्वॉड ची व्याप्ती वाढली आहे. त्याचे स्वरूप प्रभावशाली झाले आहे. आमचा परस्पर विश्वास, दृढनिश्चय हा जगातील लोकशाही शक्तींना नवी ऊर्जा आणि उत्साह देत आहे. क्वॉडच्या माध्यामातून आमचे एक मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक ‘इंडो पॅसिफिक प्रदेश’ ला प्रोत्साहन देत आहे. जे आपल्या सर्वांचे समान उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोनाचा असतानाही आम्ही लसींचे वितरण केले आहे. हवामानावर योग्य कारवाई, पुरवठा साखळीतील लवचिकता, आपत्ती प्रतिसाद, आर्थिक मदत यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये परस्पर समन्वय वाढवला आहे. तर क्वाड ग्रुप इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता, समृद्धी आणि स्थिरता सुनिश्चित करत आहे.
पीएम मोदींचा चीनला उत्तर
टोकियो, जपान येथे क्वाड लीडर्स समिटमध्ये मोदींनी चीनच्या आक्रमक वृत्तीला चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, क्वाड स्तरावर चार देशांच्या परस्पर सहकार्याने मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक प्रदेशाला प्रोत्साहन दिले जात आहे. हे आपल्या सर्वांचे समान ध्येय आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल अँथनी अल्बानीज यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सर्वप्रथम मी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे अभिनंदन करतो. निवडणुका जिंकल्याबद्दल आणि देशाच्या नवीन पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना माझ्या शुभेच्छा देतो. तुम्ही शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांनी तुम्ही क्वाड समिटमध्ये भाग घेतला. हे तुमच्या मैत्रीची ताकद आणि क्वाडशी तुमची बांधिलकी दर्शवते.
काय बोलले जो बायडेन
त्याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, इंडो पॅसिफीक मध्ये अमेरिका एक मजबूत, स्थिर आणि ग्लोबल स्थायी सदस्य राहणार. आम्ही हिंद-प्रशांत महासागरातील शक्ती आहोत. जो पर्यंत रशिया युद्ध सुरू आहे. आपण सदस्य राहू आणि ग्लोबल रिस्पॉन्सला हाताळत राहू. तसेच आपण आपली सामान्य मूल्य आणि ध्येयासाठी सोबत आहोत. क्वाडकडे भविष्यात अधिक काम आणि जबाबदाऱ्या आहेत. या क्षेत्रात शांतता, कोरोनाशी दोन हात करने, आणि जलवायू सकंटावर काम करण्यासाठी आपल्याला अजून खुप काम करायचं आहे.