एक होती महाराणी… राणी एलिझाबेथ यांचा खजिना किती माहित्ये का? संपत्तीचा आकडा ऐकाल तर चक्रावून जाल!

ब्रिटनच्या शाही घराण्याला करदात्यांकडून मोठी आर्थिक रसद मिळते. त्याला सॉवरेन ग्रँट असं म्हटलं जातं. या ग्रँटची सुरुवात किंग जॉर्ज तृतीय यांच्या काळात सुरु झाली. त्यांनी संसदेत एक करार मंजूर केला होता.

एक होती महाराणी... राणी एलिझाबेथ यांचा खजिना किती माहित्ये का? संपत्तीचा आकडा ऐकाल तर चक्रावून जाल!
राणी एलिझाबेथ Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 12:00 PM

नवी दिल्ली: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी स्कॉटलंडमध्ये दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाने गेल्या 80 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या इतिहासाची साक्षीदार हरपली आहे. एलिझाबेथ द्वितीय या 1952मध्ये ब्रिटनच्या महाराणी झाल्या होत्या. त्यांचे वडील राजे जॉर्ज षष्टम यांच्या मृत्यूमुळे त्यांना वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राज्य कारभार हाती घ्यावा लागला होता. पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय कोणत्याही देशात सहजपणे वावरू शकणाऱ्या त्या जगातील (world) पहिल्या महिला होत्या. त्या केवळ ब्रिटनच नव्हे तर जगातील एकूण 15 देशांच्या महाराणी होत्या. जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या या महाराणीने आपल्या पश्चात्ताप अब्जावधी रुपयांची संपत्ती (Net Worth) सोडली आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकाल तर तुम्हीही चक्रावून जाल.

महाराणीची संपत्ती किती?

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या एकूण संपत्ती विषयी वेगवेगळ्या मिडिया रिपोर्टमध्ये वेगेवेगळे दावे करण्यात आले आहेत. फॉर्च्युनच्या दाव्यानुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या मागे 500 डॉलरची संपत्ती सोडली आहे. म्हणजे त्यांनी एकूण 39,858,975,000 रुपयांची संपत्ती पाठी ठेवली आहे. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्स यांना राजा बनल्यानंतर वारसा हक्काने मिळणार आहे.

महाराणींचं मिळकत कशी होती?

ब्रिटनच्या शाही घराण्याला करदात्यांकडून मोठी आर्थिक रसद मिळते. त्याला सॉवरेन ग्रँट असं म्हटलं जातं. या ग्रँटची सुरुवात किंग जॉर्ज तृतीय यांच्या काळात सुरु झाली. त्यांनी संसदेत एक करार मंजूर केला होता. त्यातून स्वत:च्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना फंड मिळण्याची त्यांनी तजवीज करून ठेवली होती. या अॅग्रिमेंटला सुरुवातीला सिव्हिल लिस्ट असं संबोधतलं जायचं. 2012मध्ये त्याला सॉवरेन ग्रँट असं नाव देण्यात आलं

हे सुद्धा वाचा

संपत्तीचा वापर कशावर?

2021 आणि 2022मध्ये सॉवरेन ग्रँटची राशी 86 मिलियन एढी ठरवण्यात आली होती. या निधीचा वापर त्यांचा प्रवास, संपत्तीच्या देखभालीसाठीचा खर्च, पॅलेसची दुरुस्ती आदींसाठी वापरण्यात येत होता.

संपत्ती कुठे कुठे?

फोर्ब्सनुसार 2021मध्ये या राजेशाही घराण्याकडे 28 बिलियन संपत्ती होती. म्हणजे त्यांच्याकडे 22,28,73,70,00,00 रुपये संपत्ती होती.

  1. द क्राउन इस्टेट: 19.5 बिलियन डॉलर (15,52,15,61,25,000 रुपये)
  2. बकिंगहॅम पॅलेस:  4.9 बिलियन डॉलर (3,90,02,89,75,000 रुपये)
  3. द डची ऑफ कॉर्नवाल: 1.3 बिलियन डॉलर (1,03,47,70,75,000.0 रुपये)
  4. द डची ऑफ लँकेस्टर: 748 मिलियन डॉलर (59,53,91,17,000.00 रुपये)
  5. केंसिंग्टन पॅलेस:  630 मिलियन डॉलर (50,14,65,82,500.00 रुपये)
  6. स्कॉटलंडमधील क्राउन इस्टेट: 592 मिलियन डॉलर (47,12,18,68,000.00)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.