गर्भवती महिलांच्या DNA चा उपयोग करुन ‘सुपर सोल्जर्स’ची निर्मिती? चीनच्या ‘या’ प्रयोगांमुळे भारतासह अमेरिकेला धोका

बीजिंग : गलवान खोऱ्यात भारतासोबत (India) सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने (China) आपली सैनिकी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. याचाच भाग म्हणून चीन गर्भवती महिलांच्या डीएनएचा (DNA) उपयोग करुन आपल्या सैनिकांना ‘सुपर सोल्जर्स’मध्ये बदलण्याच्या विचारात आहे. यासाठी चीनच्या सैनिकांवर बायोलॉजिकल एक्सपेरिमेंटही (Biological Experiments) करण्यात येत आहेत. प्रयोग होत असलेले बहुतांश सैनिक भारत-चीन सीमेवर तैनात […]

गर्भवती महिलांच्या DNA चा उपयोग करुन ‘सुपर सोल्जर्स’ची निर्मिती? चीनच्या 'या' प्रयोगांमुळे भारतासह अमेरिकेला धोका
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 7:58 AM

बीजिंग : गलवान खोऱ्यात भारतासोबत (India) सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने (China) आपली सैनिकी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. याचाच भाग म्हणून चीन गर्भवती महिलांच्या डीएनएचा (DNA) उपयोग करुन आपल्या सैनिकांना ‘सुपर सोल्जर्स’मध्ये बदलण्याच्या विचारात आहे. यासाठी चीनच्या सैनिकांवर बायोलॉजिकल एक्सपेरिमेंटही (Biological Experiments) करण्यात येत आहेत. प्रयोग होत असलेले बहुतांश सैनिक भारत-चीन सीमेवर तैनात आहेत (Report of China research on pregnant women DNA for super soldier on Border).

चीनची कंपनी बीजीआय ग्रुप आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या संयुक्त प्रयोगाने भारतासह अनेक आशियायी देशांची चिंता वाढवलीय. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात बीजीआय ग्रुपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधन अहवालाची माहिती देण्यात आलीय. यानुसार सैनिकांवर ब्रेन सर्जरी करुन त्यांना हिमालयाच्या पर्वत रांगेत उंचावर तग धरुन राहण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी गर्भवती महिलांच्या डीएनएचा उपयोग करुन खास औषध बनवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की चीन जगभरातील अनेक देशांच्या गर्भवती महिलांच्या डीएनएवर संशोधन करत आहे.

चीनच्या हालचालींनी अमेरिकाही काळजीत

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सरकारने देखील चीनच्या या संशोधनावर इशारा दिलाय. चीन आनुवंशिक बदल करुन ‘सुपर सोल्जर्स’ तयार करत आहे, असं मत बायडन प्रशासनाने व्यक्त केलंय. यावरुन चीनच्या या प्रयोगांमुळे अमेरिकेनेही धास्ती घेतल्याचं दिसतंय. रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे, “चीन सैन्य आणि बीजीआय ग्रुपच्या या प्रयोगामुळे सैनिकांच्या जीनमध्ये बदल करुन त्यांना अनेक गंभीर आजारापासून संरक्षित केलं जाईल.

चीनच्या सैनिकांची थंडीमुळे होणाऱ्या आजारांपासून सुटका

चीनच्या सैनिकांना खूप उंचावर तैनात करण्यात आल्यानंतर ऐकू येण्यास कमी होण्यापासून अनेक आजार (एल्टीट्यूड सिकनेस) होत आहेत. मागील 1 वर्षात भारत-चीन सीमेवर तैनात असलेले बहुतांश चिनी सैनिक या आजारांनी त्रस्त आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठीच चीन औषध शोधत आहे. यासाठी चीनची कंपनी वेगवेगळ्या देशांमधील 80 लाख महिलांच्या डीएनएचा अभ्यास करत आहे. दुसरीकडे चिनी कंपनीने ते केवळ चीनच्या महिलांच्या डेटाचा उपयोग करत असल्याचं म्हटलंय.

हेही वाचा :

मोठी बातमी! चीनसोबत पुन्हा तणाव? भारतानं 50 हजार अतिरिक्त सैन्य चीन सीमेवर पाठवलं, ऐतिहासिक निर्णय

Special Report | चीन-पाकिस्तानचा युद्धसराव, भारतावर हल्ल्यासाठी एअरफिल्डवर विध्वंसक तयारी

Special Report | चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट, हादरवणारी घटना कॅमेरात कैद

Report of China research on pregnant women DNA for super soldier on Border

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.