Vladimir Putin | ‘अशी हालत करीन, जी….’, पुतिन खवळले, ‘या’ देशांना ओपन चॅलेंज
Vladimir Putin | जागतिक राजकारणात रशिया आणि त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं एक वेगळ स्थान आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीसमोर आज रशियाच मोठ आव्हान आहे. जागतिक राजकारणात अमेरिकेच्या दादागिरीलला रशिया वेळोवेळी आव्हान देत आलाय.
मॉस्को | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पाश्चिमात्य देशांना खुल आव्हान दिलं. पुतिन यांच्या शब्द प्रहारातून अमेरिका आणि युरोपही सुटलं नाही. आपल्या भाषणात पुतिन यांनी नाटोची सुद्धा शाळा घेतली. “मी युक्रेन आणि अन्य देशांसोबत जे केलं, तेच पाश्चिमात्य देशांना रशियासोबत करायच आहे. पण हे कधी होणार नाही” असं पुतिन म्हणाले. “रशियन संघराज्यात पाश्चिमात्य देशांचा असाच हस्तक्षेप सुरु राहिला, तर अशी हालत करीन, जी मागच्या काही युगापेक्षा अधिक दु:खद असेल. असे प्रयत्न थांबले नाहीत, तर रशिया अणवस्त्रांचा वापर करण्यासाठी सुद्धा मागे-पुढे पाहणार नाही” असा पुतिन यांनी इशारा दिला.
रशियात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या दोन आठवडेआधी वार्षिक संबोधनात व्लादिमिर पुतिन यांनी फेडरल असेंबलीला संबोधित केलं. “पाश्चिमात्य देशांना जगाला भडकवण्याची सवय आहे. ते सतत जागतिक संघर्ष वाढवतायत. फक्त आपला विकास रोखणच नाही, त्यापुढे त्यांचा इरादा आहे” स्वीडन आणि फिनलँड हे दोन देश नाटोमध्ये सहभागी झाल्यानंतर पुतिन यांनी रशियन सैन्याला अधिक मजबूत करणार असल्याच म्हटलं आहे. “लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेली शस्त्र आमच्याकडे आहेत, हे रशियाच्या विरोधकांनी लक्षात ठेवल पाहिजे” असं पुतिन म्हणाले.
…त्याच अटीवर होईल अमेरिकेशी चर्चा
रशिया युरोपवर हल्ला करु शकतो, हा अमेरिकेचा दावा पुतिन यांनी फेटाळून लावला. “अमेरिका अन्य देशांना संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करतो. यूक्रेन, मिडिल ईस्ट आणि अन्य क्षेत्रात त्यांनीच संघर्ष वाढवलाय. खोट बोलून अमेरिका आपले इरादे लपवतो. रशिया युरोपवर हल्ला करणार या दाव्याला काहीही अर्थ नाही” असं पुतिन यांनी स्पष्ट केलं. “अमेरिकेने एक खोटी गोष्ट जगाला सांगितली. रशियाने अवकाशात अणवस्त्र तैनात केली आहेत ते म्हणाले. आम्ही त्यांच्याशी चर्चा करावी, यासाठी अमेरिका हे बोलतोय. आम्ही नेहमीच आमच्या अटींवर चर्चा करतो. रशियाच भल होणार असेल, तर त्या अटीवरच आम्ही अमेरिकेशी चर्चा करु” असं पुतिन यांनी स्पष्ट केलं.