Russia Ukraine Conflict: युक्रेनमध्ये कोणी नातेवाईक अडकला असल्यास करू नका काळजी, अश्या प्रकारे होईल भारतात त्यांची वापसी!

| Updated on: Feb 23, 2022 | 8:49 PM

युद्ध जन्य परिस्थिती असताना आपले मित्र किंवा नातेवाईकांना युक्रेन मधून भारतामध्ये कसे आणावे? कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचे आहे आणि कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे आपली समस्या भारतीय एम्‍बेसी पर्यंत कशाप्रकारे पोहोचवायची?, चला तर मग जाणून घेऊया या काही प्रश्नांची उत्तरे...

Russia Ukraine Conflict: युक्रेनमध्ये कोणी नातेवाईक अडकला असल्यास करू नका काळजी, अश्या प्रकारे होईल भारतात त्यांची वापसी!
Russia Ukraine War
Follow us on

Russia Ukraine Conflict: युद्ध जन्य परिस्थिती असताना आपले मित्र किंवा नातेवाईकांना युक्रेनमधून भारतामध्ये कसे आणावे? कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचे आहे आणि कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे आपली समस्या भारतीय एम्‍बेसी पर्यंत कशाप्रकारे पोहोचवायची?, चला तर मग जाणून घेऊया या काही प्रश्नांची उत्तरे…

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धजन्य (Russia Ukraine Conflict) परिस्थिती चालूच आहे तसेच यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रशियाने (Russia) सैनिकांची संख्या वाढलेली आहे तसेच रशिया युक्रेन च्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे. यूक्रेनचे (Ukraine) विदेश मंत्री दिमित्रो कुलेबा यांचे असे म्हणणे आहे की, आम्ही प्रत्येक शहर, गाव आणि एक एक इंच जमीनसाठी नेहमी लढत राहू,असा आमचा प्रयत्न राहील. हा प्रयत्न जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत आमच्या विजय होत नाही तसेच रशियाची सेना यूक्रेनच्या दोन प्रांतांमध्ये म्हणजेच लुहांस्क-डोनेट्स्क येथे शिरली आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या दोन्ही भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी ही घटना धोक्याची ठरली आहे. एअर इंडिया भारतीय लोकांना परत आणण्याच्या कामामध्ये लागलेली आहे. जर तुमचा कोणी नातेवाईक युक्रेनमध्ये आहे तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला यूक्रेन मधून भारतात परत आणू शकता.

मित्र, नातेवाईकांना युक्रेनमधून कसे आणणार

युद्ध जन्य परिस्थिती असताना आपले मित्र किंवा नातेवाईकांना युक्रेन मधून भारतामध्ये कसे आणावे? कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे आणि कुठे आपल्याला अर्ज करायचा आहे? आपली समस्या भारतीय एम्‍बेसी पर्यंत कशाप्रकारे पोहोचवायची?, चला तर मग जाणून घेऊया या काही प्रश्नांची उत्तरे…

मित्रमंडळी व नातेवाईक यांना परत आणायचे असल्यास या काही गोष्टीची काळजी घ्या

1. ही फ्लाइट्स यूक्रेन वरून भारतात येईल

एयर इंडिया ने यूक्रेन वरून सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी स्पेशल फ्लाइट्स पाठवल्या आहेत.
24 आणि 26 फेब्रुवारीला युक्रेनच्या बोरिस्पिल एयरपोर्ट वरून हे विमान भारतात येईल. याशिवाय 25 आणि 27 फेब्रुवारी व 6 मार्चला ही फ्लाइट्स दिल्ली येथे पोहचेल.

2. येथून करू शकतात बुकिंग

एअर इंडियाच्या ट्विटनुसार जर युक्रेन वरून येणारी फ्लाईटचे तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर विमान कंपनीच्या बुकिंग सेंटर,कॉल सेंटर, ऑफिशियल वेबसाइट किंवा अधिकृत ट्रॅव्हल एजंट द्वारे तुम्ही तिकीट बुक करू शकतात.

3. इंड‍ियन एम्‍बेसीच्या गाइडलाइन नुसार दिला जातोय सल्ला

भारतीय एम्‍बेसी कडून एक गाईडलाईन जाहीर करण्यात आलेली आहे , जर युक्रेन वरून भारतामध्ये जाणाऱ्या फ्लाईटची संख्या वाढवली जाते तर याबद्दलची सूचना दिली जाईल. या जाहीर केलेल्या गाईडलाईन्स मध्ये युक्रेन मध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना भारतामध्ये परत येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना युक्रेन येथे राहणे गरजेचे नसेल तर ते भारतामधे परत येऊ शकतात.

4. यूक्रेन मध्ये असलेल्या इंड‍ियन एम्‍बेसीला आपली माहिती द्या

जाहीर केलेल्या गाईड लाईन नुसार, युक्रेनमध्ये राहणारे जे भारतीय नागरिक आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने कोणताही प्रवास करू नका आणि शक्य तितके घरी राहण्याचा प्रयत्न करा. युक्रेन येथे राहणाऱ्या सर्व भारतीयांनी आपल्याबद्दलची संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून भारतीय एम्‍बेसीला माहिती मिळेल. यामुळे इंड‍ियन एम्‍बेसी युक्रेन येथे राहणार्‍या भारतीयांनी पर्यंत सहजरीत्या पोहोचू शकेल आणि सर्व अडकलेल्या लोकांना योग्य ती मदत मिळू शकेल.

अश्या प्रकारे साधावा भारतीय एम्‍बेसीशी संपर्क ?

गाइडलाइन नुसार, कोणत्याही प्रकारची मदत आणि प्रश्नांच्या उत्तरांसाठी भारत सरकारद्वारे एक हेल्पलाइन व टोल फ्री नंबर वर जाहीर करण्यात आला आहे. यावर आपण संपर्क साधू शकतो, याशिवाय ई-मेलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हवी असलेली मदत किंवा तुमचे जे काही म्हणणे असेल ते तुम्ही भारतीय एम्बेसी पर्यंत पोहोचू शकता.

इंडियन एम्‍बेसी का फोन नम्‍बर: +380 997300428, +380 997300483

ईमेल: cons1.kyiv@mea.gov.in

संबंधित बातम्या

रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम होऊ शकतो भारतावर , महागड्या होतील या काही वस्तू!

Joe Biden : रशिया यूक्रेन वादात अमेरिका अ‍ॅक्शन मोडवर, मॉस्कोची आर्थिक रसद तोडणार, व्यापारी प्रतिबंधाची घोषणा

Russia Ukraine Issue : रशिया यूक्रेन वाद चर्चेतून सोडवा, युद्ध झाल्यास दोन तीन देशांपुरतं मर्यादित राहणार नाही : राजनाथ सिंह