Russia-Ukraine Crisis: युक्रेनवर युध्दाचे ढग गडद, युद्ध झाल्यास व्यापारावर होईल मोठा परिणाम

युक्रेनबरोबर भारताचा चांगले द्विपक्षीय व्यापारी संबंध आहे. भारत युक्रेनला औषधे आणि विद्युत यंत्रसामग्री इत्यादींची विक्री करतो, तर दुसरीकडे खाद्यतेलापासून खतांपर्यंत आणि अणुभट्ट्यांपर्यंतच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतो. युद्ध सुरू झाल्यावर या परस्पर व्यापाराला खिळ बसू शकते. परिणामी भारताच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

Russia-Ukraine Crisis: युक्रेनवर युध्दाचे ढग गडद, युद्ध झाल्यास व्यापारावर होईल मोठा परिणाम
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 1:49 PM

मागील काही दिवसांपासून जगाचे लक्ष युक्रेन-रशिया सीमेकडे(Ukraine-Russia Border) लागले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या लष्करी तणावामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाचा (3rd World War) धोका निर्माण झाला आहे. आता या युद्धाचा धोका पूर्व युरोपपुरता (Eastern Europe) मर्यादित नसून अमेरिका आणि भारत भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी या दोघांना या युध्दाची झळ बसणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये क्रायमियावरून युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढण्यापूर्वी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता. 2015 मध्ये तणावानंतर ते केवळ 1.8 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आला. तेव्हापासून त्यात म्हणावी तशी गती साधता आली नाही.जगभरातील शेअर बाजारात सर्वत्र विक्रीचे सत्र जोरात सुरू आहे. या तणावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian Economy) आणि व्यापाराचे मोठे नुकसान होण्याचा संभव आहे.

युक्रेनबरोबर भारताचा व्यापार कसा?

भारतातील युक्रेनियन दूतावासाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध आकडेवारीनुसार, 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये 2.69 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. युक्रेनने भारताला 1.97 अब्ज डॉलरची निर्यात केली, तर भारताने युक्रेनला 721.54 दशलक्ष डॉलरची निर्यात केली. युक्रेन भारताला घरगुती खाद्यतेल व इतर सामुग्री, अणुभट्टी आणि बाष्पवहनपात्र (Necluar Reactors and Boiler) यांची निर्यात करतो. तर भारताकडून औषधी आणि इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी करतो.

युक्रेनकडून खरेदी करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तू

ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारताने युक्रेनकडून 1.45 अब्ज डॉलरचे खाद्यतेल खरेदी केले, त्याचप्रमाणे युक्रेनमधून सुमारे 210 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे अन्न आणि सुमारे 103 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या अणुभट्ट्या आणि बॉयलरची मागणी नोंदविली. अणुभट्ट्या आणि बॉयलरच्या बाबतीत युक्रेन हा रशियानंतर भारताला सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. त्याच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यास अणुऊर्जेवरील भारताची गती संथ होईल.

युक्रेन व्यापारात भारत-रशिया हा महत्त्वाचा घटक

गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांतील व्यापाराचा कल पाहिला तर रशियाशी असलेल्या संबंधांनुसार त्यात चढ-उतार होत आहेत. 2014 मध्ये क्रायमियावरून युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढण्यापूर्वी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता. 2015 मध्ये तणावानंतर ते केवळ 1.8 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले. पुढे युक्रेनबरोबरचा द्विपक्षीय व्यापार काहीसा सुधारला, पण तरीही त्यात म्हणावी तशी प्रगती साधता आली नाही. व्यापारात अमुलाग्र बदल झाला नाही.

इतर बातम्या-

PHOTO | बीड प्रशासनाला डोकंय का? झाडावर चढून आंदोलन करतात म्हणून थेट कुऱ्हाडच चालवली! वृक्षप्रेमी संघटना आक्रमक!

Shiv Sena Bhavan | शिवसेना भवन परिसरात जय्यत तयारी! LED स्क्रीन सज्ज, कार्यकर्त्यांची लगबग

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.