रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम होऊ शकतो भारतावर , महागड्या होतील या काही वस्तू!

गेल्या अनेक दिवसापासून रशिया - युक्रेन युद्धाच्या बातम्या सगळीकडे चचेर्चा विषय बनला आहे. जर या दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्ध झाल्यास याची झळ भारताला सुद्धा भोगावी लागेल .अश्या अनेक गोष्टी महाग होतील, ज्या वस्तूसाठी भारताला या दोन्ही देशांवर अवलंबून राहावे लागते.

रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम होऊ शकतो भारतावर , महागड्या होतील या काही वस्तू!
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 6:48 PM

दिल्लीः गेल्या अनेक दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्धाच्या (russia ukraine war) बातम्या सगळीकडे चचेर्चा विषय बनला आहे. सर्व जगाचे लक्ष या दोन्ही देशांच्या प्रत्येक हालचालीकडे लागले आहे. जर भविष्यात रशिया-युक्रेन या देशांत युद्ध झाले तर या युध्दाचा फटका सर्व सामान्यांच्या खिशालादेखील बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या युद्धामुळे सर्वसामान्य व्यक्तीसाठी लागणाऱ्या अनेक जीवनावश्यक वस्तू (essential things) महाग होतील असे सांगण्यात येत आहे. जीवनावश्यक पदार्थांच्या किंमतीत वाढ होऊन भारतीय लोकांवर याचा परिणाम जाणवू लागेल. रशिया आणि युक्रेन यांच्यात दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. या तणावाचा परिणाम अनेक आर्थिक गोष्टींवर सुद्धा होण्याचा अंदाज लावण्यात येत आहे. या युद्धामुळे गहू, नैसर्गिक वायू यांसारख्या अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ होईल, अशी भीती तज्ञांनी वर्तवली आहे. जर या सगळ्या जीवनावश्यक वस्तूची किंमत वाढली तर भविष्यात आर्थिक संकट (economic crisis) उद्भवू शकेल, चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत ,याचा परिणाम थेट भारतावर व भारतातील सर्वसामान्य जनतेवर होणार आहे त्याबद्दल..

नैसर्गिक तेलांच्या किंमती वाढतील

रशिया-युक्रेन यांच्यात चालू असलेल्या वादामुळे ब्रेंट क्रूड तेलाची किंमत वाढलेली आहे. प्रती बॅरल ब्रेंट क्रूडची किंमत 96 डॉलर झाली आहे. ही झालेली वाढ वर्ष 2014 पासून नंतरची सर्वाधिक झालेली वाढ आहे असे म्हंटले जात आहे.

रशिया या देशात कच्च्या तेलाची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. या दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या वादामुळे भविष्‍यात तेलाच्या किमतीच्या आपल्याला वाढ दिसू शकते. ही वाढ प्रति बॅरेल 100 डॉलर वर देखील जाऊ शकते. कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी वाढ ही चिंता दर्शवणारी आहे, यामुळे जागतिक पातळीच्या जीडीपीमध्ये वाढ होऊ शकते.

जेपी मॉर्गन यांनी केलेल्या विश्लेषणात असे म्हटले गेले आहे की , तेलांच्या किंमती मध्ये प्रती बॅरेल 150 डॉलर वाढल्यास जागतिक जिडीपी फक्त 0.9 टक्क्याने कमी होतील.

घाऊक किंमत निर्देशक मध्ये ( WPI) कच्च्या तेलाची संबंधित असलेले जे काही उत्पादन आहेत त्यांचा शेअर 9 टक्के पेक्षा जास्त आहे. ब्रेंट क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यास भारताचा डब्ल्यू पी आय 0.09 टक्के निवडू शकतो.

तज्ज्ञ मंडळींच्या मते, जर रशिया आणि चीन या दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास घरगुती नैसर्गिक वायूच्या ( सिएनजी, पिएनजी , इलेक्ट्रिसिटी ) किंमतीमध्ये दहा पट वाढ होण्याची शक्यता आहे.

एलपीजी, केरोसीन यांच्या सबसिडीत होईल वाढ

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे एलपीजी, केरोसीन यांच्या सबसिडी मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेट्रोल-डिझेल यांचे दर वाढतील

कच्च्या तेलाच्या किमती मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस ते पेट्रोल व डिझेल यांची झालेली वाढ आपण सर्वांनी पाहिलीच आहे. वर्ष 2019 मध्ये कच्चे तेल व इंधन यांच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. रशिया युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये हा वाद असाच चालू राहिला तर भविष्यात इंधन दरांमध्ये देखील आपल्याला वाढ झाल्याची पाहायला मिळेल. भारताच्या एकूण आयाती पैकी 25 टक्के आयात कच्च्या तेलाची केली जाते. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के पेक्षा जास्त तेल आयात करत असतो. जर ही वाढ अशीच राहिली तर सध्याच्या परिस्थिती चा सगळ्या व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतो.

गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता

काळा समुद्र असणाऱ्या भागाच्या प्रदेशात जर गव्हाची आयात निर्यात करताना काही व्यत्यय आल्यास गव्हाची किंमत आणि इंधनाचा दर वाढू शकतो,अशी भीती तज्ञ मंडळांनी व्यक्त केली आहे. रशिया हा देश जगातील सर्वात मोठा गहू निर्यात करणारा देश आहे व त्यानंतर युक्रेन हा देश जगातील चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. गव्हाच्या एकूण जागतिक निर्याती पैकी एकंदरीत एक चतुर्थाश वाटा या दोन्ही देशांचा आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांचा एक अहवाल समोर आलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, कोरोना महामारी मुळे आधीच अन्नधान्याच्या किमती मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे.जर या वस्तू मध्ये वाढ पुन्हा झाल्यास सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होऊन जाईल.

संबंधित बातम्या

Joe Biden : रशिया यूक्रेन वादात अमेरिका अ‍ॅक्शन मोडवर, मॉस्कोची आर्थिक रसद तोडणार, व्यापारी प्रतिबंधाची घोषणा

Russia Ukraine Issue : रशिया यूक्रेन वाद चर्चेतून सोडवा, युद्ध झाल्यास दोन तीन देशांपुरतं मर्यादित राहणार नाही : राजनाथ सिंह

नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर डिबेट करायचीय, इमरान खान यांचा नेमका प्लॅन काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.