Russia Ukraine Crisis: ‘आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्धही जिंकू’, युक्रेनची गर्जना
गुरुवारी केलेल्या संबोधनात व्लादिमिर पुतिन (Vladimir putin) यांनी सैन्याला आक्रमणाचे आदेश दिले आहेत. पुतिन यांनी रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये संघर्ष अटळ असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली: रशियाने युक्रेनविरोधात युद्ध (Russia-Ukraine war) पुकारलं आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव (Kyiv) आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या दिशेने चाल करुन येत असताना, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्ध जिंकू असं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमिट्रो कुलेबा (Dmytro Kuleba) म्हणाले. गुरुवारी केलेल्या संबोधनात व्लादिमिर पुतिन यांनी सैन्याला आक्रमणाचे आदेश दिले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये संघर्ष अटळ असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवण्याचे आव्हान केलं आहे. युक्रेनची लष्करीशक्ती संपवणं हा लष्करी कारवाईमागे उद्देश असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे.
आता कृती करण्याची वेळ आली
युक्रेनवर लष्करी चाल करुन जातानाच व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेसह अन्य देशांना थेट इशारा दिला आहे. “आमच्या कारवाईत हस्तक्षेप केला, तर पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील”. “रशियाने पूर्ण क्षमतेने आक्रमण केलं आहे. युक्रेनच्या शांततामय शहरांवर हल्ला झाला आहे. युक्रेन स्वत:च रक्षण करेल व हे युद्ध जिंकेल. जगाने पुतिन यांना रोखलं पाहिजे. आता कृती करण्याची वेळ आली आहे” असं दिमिट्रो कुलेबा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. ते युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आहेत.
So world war 3 has started, and guess who are affected by this??, THE INNOCENT CIVILIANS#Russia #Ukraine pic.twitter.com/UFIw2RAvXS#RussiaUkraineConflict
— Justin (@Jst_inb) February 24, 2022
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज सकाळी लष्करी कारवाईचे म्हणजे युद्धाचे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या कीव आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुगंस्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, तेव्हाचं पुतिन कुठल्याही क्षणी युद्ध पुकारू शकतात, हे स्पष्ट झालं होतं. पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर, आता युरोपसह जगावर त्याचे परिणाम होऊ शकतात.
Russia Ukraine Crisis Will defend and win says Ukraine after Russia declares war