Russia Ukraine War Live : यूक्रेन नाटोत सहभागी होणार नाही, राष्ट्रपती झेलेंस्की यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Mar 19, 2022 | 8:31 AM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : यूक्रेन नाटोत सहभागी होणार नाही, राष्ट्रपती झेलेंस्की यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 19 दिवस उलटले आहेत. आज युद्धाचा 20 वा दिवस आहे. दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने मोठा दावा केला आहे. युक्रेनच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, डोनबासमध्ये रशियन आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये चकमक सुरू आहे. युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की त्यांनी सोमवारी रात्री 100 रशियन सैनिक मारले आणि सहा वाहने नष्ट केली आहेत. आज दिवसभरात युद्धातील प्रत्येक महत्त्वाची बातमी इथे पाहायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Mar 2022 06:30 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियांच्या बेल्गोरोड, कुर्स्क मार्गे भारतात आणण्याचा प्रयत्न

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियाच्या बेल्गोरोड, कुर्स्क मार्गे  भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

  • 15 Mar 2022 10:03 PM (IST)

    आम्हाला माहिती आहे नाटोत सहभागी होऊ शकत नाही: झेलेंस्की

    यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेंस्की यांनी आम्ही गेल्या काही वर्षांपासून नाटोच्या सहभागाबद्दल ऐकतोय. मात्र, आम्ही नाटोत सहभागी होऊ शकत नाही, असं झेलेंस्की म्हणाले.

  • 15 Mar 2022 07:36 PM (IST)

    यूक्रेन नाटोत सहभागी होणार नाही, राष्ट्रपती झेलेंस्की यांचं मोठं वक्तव्य

    रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान दोन्ही देशांची चर्चा सुरु आहे. राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी यूक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे.

  • 15 Mar 2022 02:30 PM (IST)

    रशियाकडून कीवमध्ये हल्ले सुरुच, 15 मजली इमारतीला आग

    रशियाची राजधानी कीवच्या नागरी भागात मंगळवारी रशियाकडून हवाई हल्ले करण्यात आले. त्यामुळं 15 मजली इमारतीला आग लागली. याषिवाय हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • 15 Mar 2022 11:25 AM (IST)

    जाहिरातींच्या बाजारपेठेत रशियाचे अब्जावधींचे नुकसान होईल

    युद्धानंतर रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. जाहिरातींच्या बाजारपेठेत रशियाचे अब्जावधींचे नुकसान होईल. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की रशियाच्‍या शीर्ष 30 सर्वात मोठ्या जाहिरातदारांपैकी अर्ध्याहून अधिक विदेशी ब्रँड आहेत. त्याच वेळी, 16 पैकी 13 ने आधीच रशियाशी व्यापार बंद करण्याची घोषणा केली आहे.

  • 15 Mar 2022 11:23 AM (IST)

    रशिया मे महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनमधील लष्करी आक्रमण संपवू शकतो

    युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच यांनी सांगितले की, रशिया मे महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनमधील लष्करी आक्रमण संपवू शकतो. कारण तोपर्यंत रशियाकडे असलेली सर्व संसाधने संपून जातील.

  • 15 Mar 2022 11:21 AM (IST)

    युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने पुतीन खोटारडे आणि देशद्रोही असल्याचे म्हटले

    युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने पुतीन खोटारडे आणि देशद्रोही असल्याचे म्हटले आहे. रशिया हा आक्रमक देश आहे, तो गुन्हेगारी देश आहे. पण हे युद्ध आपण जिंकूच.

  • 15 Mar 2022 10:11 AM (IST)

    राजधानी कीवमध्ये दोन स्फोटांचे आवाज

    राजधानी कीवमध्ये दोन स्फोटांचे आवाज

    युक्रेनमधून एक मोठी बातमी येत आहे. राजधानी कीवमध्ये दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. हा स्फोट इतका जोरदार होता की शहराच्या नैऋत्येकडील खिडक्यांच्या काचा फुटल्या.

  • 15 Mar 2022 10:06 AM (IST)

    युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू

    रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. मात्र याला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, आज रशियाशी चर्चा होणार आहे. ते म्हणाले की, युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू आहे. यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा झाली आहे.

  • 15 Mar 2022 10:04 AM (IST)

    जपानने 17 रशियन नागरिकांवर निर्बंध लादले

    जपानने 17 रशियन नागरिकांवर निर्बंध लादले आहेत ज्यात स्टेट ड्यूमाचे प्रतिनिधी, रेनोव्हा ग्रुपचे मालक व्हिक्टर वेक्सेलबर्ग आणि युरी कोवलचुक यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

  • 15 Mar 2022 08:01 AM (IST)

    रशियाकडे आता फारच कमी दारूगोळा शिल्लक

    युरोपमधील अमेरिकन सैन्याचे माजी कमांडर बेन हॉजेस म्हणाले की, रशियाकडे आता फारच कमी दारूगोळा शिल्लक आहे. हे एक द्रुत ऑपरेशन होते जे नंतर युद्धात बदलले.

  • 15 Mar 2022 07:57 AM (IST)

    रशिया आणि युक्रेन युद्ध अजून दहा दिवस सुरू राहिल – यूएस आर्मी जनरल

    रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 20 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र अद्याप युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. आता निवृत्त झालेल्या यूएस आर्मी जनरलला असा विश्वास आहे की आता फक्त 10 दिवस बाकी आहेत. यानंतर रशिया मूडमध्ये असेल. त्याचा दारूगोळा संपेल. मग तो लढू शकणार नाही.

Published On - Mar 15,2022 6:34 AM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.