Russia Ukraine War Live : आतापर्यंत तीस लाख लोकांनी सोडला युक्रेन
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाकडून युक्रेनच्या मोठ्या शहरांना लक्ष बनवण्यात येत आहे. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत लाखो युक्रेनियन नागरिकांनी आपला देश सोडला आहे. दरम्यान आता रशिया युक्रेनमध्ये रासायनिक युद्ध करू शकतो असा इशारा नाटोकडून देण्यात आला आहे. आम्हाला भीती वाटते की, रशिया युक्रेनविरोधात रासायनिक युद्धाला सुरुवात करू शकतो. तसे झाल्यास हे सर्वाधिक क्रूर युद्ध असेल, असे नाटोचे सेक्रेटरी जनरल जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटले आहे.
#WATCH | We are concerned that Moscow could stage a false flag operation possibly including chemical weapons, in Ukraine. Any support to Russia, be it military or any other support will help it conduct brutal war against #Ukraine: NATO Secy-Gen Jens Stoltenberg
(Source: Reuters) pic.twitter.com/ASIv8To2ak
— ANI (@ANI) March 15, 2022
LIVE NEWS & UPDATES
-
आतापर्यंत तीस लाख लोकांनी सोडला युक्रेन
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आतापर्यंत युद्धाच्या भीतीपोटी तब्बल तीस लाख लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती युक्रेन प्रशासनातील एका उच्चपदस्त अधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आली आहे.
-
पुढील आठवड्यात जो बायडन युरोप दौऱ्यावर
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बायडन पुढील आठवड्यात युरोप दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते नाटोचे सदस्य असलेल्या देशांसोबत युक्रेन आणि रशिया युद्धाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
-
-
युक्रेनमध्ये दोन पत्रकांरांचा मृत्यू
युक्रेनमध्ये युद्धाचे वार्तांकन करत असलेल्या दोन पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. हे दोनही पत्रकार ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. वार्तांकनादरम्यान त्यांच्या वाहनाला आग लागली. या आगीतच त्यांचा मृत्यू झाला आहे.. पियरे जकर्जवेस्की (55) आणि ऑलेक्जेंड्रा (20) अशी त्यांची नावे आहेत.
.
-
रशियाने युक्रेनच्या पाचशे नागरिकांना बंदी बनवले
रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच असून, युक्रेनच्या मारियुपोल भागातील जवळपास पाचशे नागरिकांना रशियाने बंदी बनवल्याची माहिती समोर येत आहे.
-
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियांच्या बेल्गोरोड, कुर्स्क मार्गे भारतात आणण्याचा प्रयत्न
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियाच्या बेल्गोरोड, कुर्स्क मार्गे भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
-
Published On - Mar 16,2022 6:17 AM