Russia Ukraine War Live : रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा नरमाईचा सूर, म्हणाले, युक्रेन सरकार पाडण्याचा उद्देश नाही
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक युक्रेननियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मोठ्याप्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. गेल्या चौदा दिवसांमध्ये सहाशेहून अधिक मिसाईल रशियाने युक्रेनवर डागल्या आहेत. तसेच रशियाकडू युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे युक्रेनकडून देखील रशियाला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्र आणि जपानने देखील रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. आता या सर्व घडामोडीदरम्यान एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे ती म्हणजे रशियाने युक्रेमध्ये पुन्हा एकदा युद्धविरामाची घोषणा केली आहे. यापूर्वी दे्खील रशियाने परदेशी नागरिकांना युक्रेनबाहेर पडण्यासाठी पाच तासांचा एक युद्द विराम घेतला होता.
Russia announces humanitarian ceasefire in Ukraine for Wednesday
Read @ANI Story | https://t.co/t6VCFvlXRB#Russia #UkraineCrisis pic.twitter.com/f4FafV4wGW
— ANI Digital (@ani_digital) March 8, 2022
LIVE NEWS & UPDATES
-
10 लाख युक्रेनियन मुलांना सामान्य जीवन आणि मित्र परिवार सोडण्यास भाग पाडले
खार्किव या गृह नगरात बॉम्बस्फोट सुरू होताच, अन्नामारिया मसलोवस्का हिने तिचा मित्रपरिवार, खेळणी आणि सामान्य युक्रेनियन जीवन सोडून आपल्या आईसोबत पलायन केले. पश्चिमेकडील देशात आश्रयस्थान शोधण्यासाठी ती बरेच दिवस लांबचा रस्ता चालली.
-
युक्रेनला मदत करण्याबाबत अमेरिकेच्या खासदारांमध्ये सहमती
युक्रेन आणि युरोपियन मित्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी 13.6 अब्ज डॉलर निधी प्रदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या द्विपक्षीय ठरावाच्या मसुद्याला बुधवारी यूएस काँग्रेसच्या सदस्यांनी सहमती दर्शवली. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या 15 ट्रिलियन डॉलरच्या उर्वरित बजेटचा भाग म्हणून फेडरल एजन्सींना कोट्यवधी डॉलर्सची अतिरिक्त मदत देण्यासही खासदारांनी सहमती दर्शविली आहे.
-
-
युक्रेनच्या चेरनोबिलमध्ये वीज खंडित
युक्रेनच्या चेरनोबिल अणु प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियाच्या हल्ल्यामुळे येथील काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. युक्रेनचे ऊर्जा ऑपरेटर युक्रेनर्गो यांनी बुधवारी सांगितले की, चेरनोबिल पॉवर प्लांट आणि त्याच्या सुरक्षा यंत्रणेची वीज पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे.
-
चीनने युक्रेनला मदत पाठवली, पण रशियावरील निर्बंधांच्या विरोधात
चीनने सांगितले की ते युक्रेनला 50 लाख युआन (जवळपास 7.91 लाख डॉलर्स) किमतीचे अन्नधान्य आणि इतर दैनंदिन गरजेचं साहित्य पाठवत आहे. तथापि, पूर्व युरोपीय देशाविरुद्ध लष्करी कारवाईमुळे रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यास चीनचा विरोध कायम आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकारांना सांगितले की, मदतीची पहिली खेप बुधवारी युक्रेनला सुपूर्द करण्यात आली आणि दुसरी खेप लवकरात लवकर पाठवली जाईल. चीन मोठ्या प्रमाणावर रशियाला पाठिंबा देत आहे आणि झाओ यांनी पुनरुच्चार केला की बीजिंग मॉस्कोविरूद्ध आर्थिक निर्बंधांना विरोध करते.
-
रशियन सैन्य कीवमध्ये घुसण्याची शक्यता
रशियन सैन्य कधीही कीवमध्ये घुसू शकते. रशियन सैनिक कीवमधील एरपिनपासून फक्त 3 किमी दूर आहेत. इरपिनमधून सामान्य लोकांना वेगाने बाहेर काढले जात आहे.
-
-
कॅनडा युक्रेनला लष्करी उपकरणे पाठवणार
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, ‘मी नुकतेच राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना सांगितले आहे की कॅनडा अल्ट्रा-स्पेशालिटी लष्करी उपकरणांची दुसरी खेप युक्रेनला पाठवणार आहे. रशियावरील निर्बंध आणि युक्रेनला मानवतावादी मदत यावर चर्चा झाली असून त्यांना कॅनडाच्या संसदेत संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
-
पाकिस्तानी विद्यार्थीनीने मानले पंतप्रझान मोदींचे आभार
युक्रेनमध्ये (Ukraine)अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थीनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. रशिया (Russia)आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात अचानक युद्ध सुरू झाल्याने ही विद्यार्थीनी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकली होती. वाचा सविस्तर वृत्त – इथे क्लिक करा
पाहा व्हिडीओ –
#WATCH | Pakistan’s Asma Shafique thanks the Indian embassy in Kyiv and Prime Minister Modi for evacuating her.
Shas been rescued by Indian authorities and is enroute to Western #Ukraine for further evacuation out of the country. She will be reunited with her family soon:Sources pic.twitter.com/9hiBWGKvNp
— ANI (@ANI) March 9, 2022
-
खारकीव शहर पूर्णपणे उद्ध्वस्त!
रशियाच्या हल्ल्यात खारकीव शहरातील इमारती पूर्णपणे पोखरल्या आहेत. इमारीतीचं हल्ल्यात मोठं नुकसान झालं असल्याचं भीषण वास्तव फोटोंमधून समोर आलं आहे.
The city of #Izyum in the #Kharkiv region lies in ruins pic.twitter.com/OWFs2pcfXQ
— NEXTA (@nexta_tv) March 9, 2022
-
सेवेरोदेनेत्स्कमध्ये 10 जणांची गोळ्या झाडून हत्या
युक्रेनच्या सेवेरोदेनेत्स्कमध्ये 10 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सेवेरोदेनेत्स्कमध्ये हे युक्रेनच्या पूर्व भागात असलेलं एक शहर आहे.
Russia says US, European sanctions on aviation threaten the safety of Russian passenger flights – RIA citing foreign ministry
— TRT World Now (@TRTWorldNow) March 9, 2022
-
KFC आणि पिझ्झा हटने रशियात काम थांबवलं
फास्टफूड चेन असलेल्या KFC आणि पिझ्झा हटने रशियात आपलं काम बंद केलंय. 1 हजारहून अधिक केएफसी आणि 50 पिझ्झा हटच्या शाखा रशियामध्ये होत्या. त्या आता बंद करण्याचा निर्णय यम ब्रान्ड्स इंकने जाहीर केलाय.
-
सूमीमधील हल्ल्यात 22 लोक ठार
सूमीमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 22 लोक ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश
-
रशिया ट्रान्सनिस्ट्रियाकडून घेणार सैन्याची मदत
रशिया युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धात आता ट्रान्सनिस्ट्रियाची मदत घेणार आहे. रशिया ट्रान्सनिस्ट्रियाकडून लढण्यासाठी 800 सैनिक घेणार आहे.
-
अमेरिकेने पोलंडची मागणी फेटाळली
युक्रेनसाठी रशियन बनावटीची लढाऊ विमाने देण्यात यावीत, अशी मागणी पोलंडने अमेरिकेकडे केली होती. मात्र अमेरिकेने पोलंडची ही मागणी फेटाळली आहे.
US rejects Poland’s offer to give it Russian-made fighter jets for Ukraine: Reuters
— ANI (@ANI) March 9, 2022
-
पाकिस्तानच्या अस्मा शफीकने मानले मोदी सरकारचे आभार
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ऑपरेशन गंग नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. याचदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थीनी अस्मा शफीकची देखील युक्रेनमधून सुटका केली आहे. तीने याबद्दल मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
#WATCH | Pakistan’s Asma Shafique thanks the Indian embassy in Kyiv and Prime Minister Modi for evacuating her.
Shas been rescued by Indian authorities and is enroute to Western #Ukraine for further evacuation out of the country. She will be reunited with her family soon:Sources pic.twitter.com/9hiBWGKvNp
— ANI (@ANI) March 9, 2022
-
संपूर्ण जगाचा आम्हाला पाठिंबा – झेलेन्स्की
रशियाने आमच्यावर हल्ला केला, त्यामुळे संपूर्ण जग रशियाचा निषेध करत आहे. यापुढे कोणताही देश रशियाच्या मदतीला पुढे येणार नाही. याऊलट अनेक देश आम्हाला मदत करत आहेत. युद्धानंतर ते आम्हाला या बिकट परिस्थितीतून सावरण्यास मदत करतील असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
“The world doesn’t believe in Russia’s future, doesn’t talk about it. They talk about us, they are helping us, they are ready to support our recovery after the war,” The Kyiv Independent quotes Ukrainian President Zelensky pic.twitter.com/AZcIuSXf5i
— ANI (@ANI) March 8, 2022
Published On - Mar 09,2022 6:16 AM