युक्रेनच्या राजधानीत धुमचक्री सुरुच, रशियन सैनिकांकडून हवाई पट्ट्या काबीज करण्याचा प्रयत्न, युक्रेन प्रशासनाचे नागरिकांना बाहेर न पडण्याचा सल्ला
मुंबईः रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. कीवमध्ये घुसलेल्या सैनिकानी आता कीवमधील (Kyiv) हवाई पट्ट्या (Fighting on the […]
मुंबईः रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आता एका निर्णायक वळणावर आले आहे. आता रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने युद्धाची दाहकता आता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रशियन सैनिक कीवमध्ये घुसल्याने येथील नागरिकांना लपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. कीवमध्ये घुसलेल्या सैनिकानी आता कीवमधील (Kyiv) हवाई पट्ट्या (Fighting on the Streets) काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे युक्रेननही आता तीव्र लढा युक्रेनच्या जहाजावर हल्ला करणारे ड्रोन पाडले असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
रशियन सैनिक राजधानी कीवमध्ये घुसले असल्याने नागरिकांना सावधान आणि सतर्क राहण्याचा व बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सांगण्यात आले आहे की, तुम्ही जर घरात असाल तर तिथेच लपून राहा, घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करुन घ्या, बाल्कनीमध्ये जाऊ नका अशा सूचना कीव प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Shocking! A tank CHANGES direction to drive over a car! #RussiaUkraineWarpic.twitter.com/i9g0YiJRuV
— Jason Hanifin (@JasonHanifin) February 25, 2022
घरातील बाथरुममध्ये लपून राहा
जरी नागरिकांनी घरांचा आसरा घेतला असला तरी लपून राहण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील थरुमचा वापर करा. त्यामुळे रशियन सैनिकांनी जर अंधाधूंद गोळीबार केला तर त्यापासून तुमचे संरक्षण होईल. या काळात बाहेर कुठेही सायरनचा आवाज येत असेल तर जवळ उभा केलेल्या शेल्टरमध्ये जाऊन थांबा, शेल्टरचा आसरा घेण्यासाठी युक्रेन सरकारने नागरिकांसाठी नकाशे उपलब्ध करुन दिले आहेत.
रशियन सैन्याला हवाई पट्टींची का गरज आहे?
रशियन सैन्य ज्या वेळी कीवमध्ये घुसले आहे, तेव्हापासून हे कीवमधील हवाई पट्टी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण त्यांना लष्करी वाहतूक, आपले सैन्य आणि उपकरणे हलविण्यासाठी हवाई पट्टीची गरज आहे.म्हणूनच गोस्टोमेल आणि वासिलकोव्हमधील हवाई पट्टी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, मात्र अजूनपर्यंत त्यांना हवाई पट्टी उपलब्ध झाला नाही. यानंतर युक्रेनच्या संरक्षण खात्याने जाहीर केले आहे की, रशिया आता ड्रोनद्वारे हल्ले करत आहे. युक्रेनच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर थांबलेल्या संरक्षण दलाच्या जहाजावर मानवविरहित ड्रोनच्या सहाय्याने त्या जहाजावर हल्ला करण्यात आहे.
सीमा रक्षकांनी ड्रोनवर गोळीबार केला
रशियाकडून आता मानवरहित ड्रोनचा हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. युक्रेनच्या किनाऱ्यावरील संरक्षणासाठी थांबलेल्या जहाजांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला गेला आहे. त्यामुळे मानवविरहित ड्रोनवर युक्रेन सैनिकांकडून आता जोरदार पणे हल्ला करण्यात येत आहे. जहाजावर हल्ला करण्यासाठी हवेत फिरणाऱ्या ड्रोनवर युक्रेन सैनिकांनी हल्ला करुन ते पाडण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Video: जेव्हा पुतीनच्यासमोर रशियाचे स्पाय प्रमुख चळाचळा कापायला लागले, बोबडी वळली, काय झालं होतं?