Russia-Ukraine War : 17 प्रदेश, 188 ड्रोन आणि विध्वंस…रशियाच्या विनाशकारी हल्ल्याने हादरलं युक्रेन

Russia Ukraine War : रशियाच्या ड्रोन्सनी युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडवला आहे. युक्रेनच्या 17 प्रदेशांना टार्गेट करुन 188 ड्रोन्स डागण्यात आले. अमेरिकेत सत्ता बदल होईपर्यंत अजून काही दिवस हे युद्ध चालेल अशी शक्यता आहे. दिवसेंदिवस ही लढाई अजून घनघोर स्वरुप धारण करत चालली आहे.

Russia-Ukraine War : 17 प्रदेश, 188 ड्रोन आणि विध्वंस...रशियाच्या विनाशकारी हल्ल्याने हादरलं युक्रेन
Russia-Ukraine War
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 12:09 PM

रशियाच्या ड्रोन हल्ल्याने युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडवून आणला आहे. रशियाने मध्यरात्री युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला. युक्रेनच्या 17 भागांमध्ये 188 ड्रोन्सने हल्ला केला. रशियाचे बहुतांश ड्रोन्स इंटरसेप्ट करण्यात आले, असा युक्रेनी डिफेंस फोर्सचा दावा आहे. रशियाने पोर्ट सिटी ओडेसा ते खारकीवपर्यंत ड्रोन हल्ले केले. युक्रेनच मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर आणि ऑईल फॅसिलिटीवर बहुतांश हल्ले केले. रशियाच्या ड्रोन हल्ल्यात युक्रेनच मोठ नुकसान झालं आहे. रशियाच्या हल्ल्याने गोंधळलेल्या युक्रेनने बश्किरियावर मोठा हल्ला केला. रशियाच्या सलावत शहरातील तेल आणि गॅस प्लान्टवर सुसाइड ड्रोनद्वारे हल्ले केले.

रशियाच्या बश्कोर्तोस्तान भागात युक्रेनने ड्रोनद्वारे मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. युक्रेनी ड्रोन ऑईल रिफायनरीच्या जवळ येताच रशियन डिफेन्स सिस्टिमने प्रतिहल्ला चढवला, असा रशियन लष्कराने दावा केला आहे. युक्रेनचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला, असं रशियाने म्हटलं आहे. रशियाच्या वोरोनिशला युक्रेनच्या हल्ल्याची झळ बसली. बॉर्डरपासून 250 किलोमीटर आत युक्रेनने ड्रोनद्वारे विनाशकारी हल्ले केले. जोरदार स्फोटानंतर अनेक इमारतींमध्ये आगी लागल्या.

एकाचवेळी शेकडो कत्यूषा रॉकेट्स डागले

लॉन्ग रेंज मिसाइलचा धाक दाखवणाऱ्या युक्रेनने बेलगोरोदला टार्गेट केलं. यावेळी अनेक भागात स्फोटाचे जोरदार आवाज ऐकू आले. मिसाइल हल्ल्यामुळे मोठ नुकसान झालं. अनेक ठिकाणी आगीच्या ज्वाळा दिसल्या. डोनेस्कमध्ये अनेक आघाड्यांवर युद्धा सुरु आहे. यावेळी रशियन सैन्याने युक्रेनी बेसवर मोठा हल्ला केला. रशियाने मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टिमद्वारे एकाचवेळी शेकडो कत्यूषा रॉकेट्स डागले. यामुळे युक्रेनी पोस्टमध्ये एकच पळापळ सुरु झाली.

कुर्स्कमध्ये घनघोर लढाई

युक्रेनी सैन्याने कुर्स्कमध्ये रशियन ठिकाणांवर फ्रान्सकडून मिळालेल्या AASM-250 हॅमरने हल्ले केले. एअर-टू-सरफेस मिसाइल हल्ल्यात रशियन ठिकाण उद्धवस्त करण्याचा व्हिडिओ युक्रेनने जारी केला आहे. कुर्स्कमध्ये अनेक आघाड्यांवर रशिया आणि युक्रेनमध्ये आमने-सामनेची लढाई सुरु आहे. ट्रेंचमध्ये लपलेल्या युक्रेनी सैनिकांवर रशियन सैनिकांनी अचानक हल्ला केला. रशियाच्या शेलिंगमध्ये 20 पेक्षा जास्त युक्रेनी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.