Russia Ukraine War Live : बुखारेस्ट येथून 250 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना

| Updated on: Feb 27, 2022 | 12:51 AM

आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील रशीयाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आजा या युद्धाचा तिसार दिवस. दरम्यान काल युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. नाटोचे सदस्य असलेल्या देशाने रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबावेत अशी मागणी केली आहे.

Russia Ukraine War Live : बुखारेस्ट येथून 250 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना
रशिया आणि युक्रेन युद्धाचे लाईव्ह अपडेटस
Image Credit source: AFP
Follow us on

Russia-Ukraine Crisis 2022 Live Updates and Latest News in Marathi आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील रशीयाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आजा या युद्धाचा तिसार दिवस. दरम्यान काल युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. नाटोचे सदस्य असलेल्या देशाने रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबावेत अशी मागणी केली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिक सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करताना दिसून येत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Feb 2022 09:56 PM (IST)

    बुखारेस्ट येथून 250 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना

    बुखारेस्ट येथून 250 भारतीयांना घेऊन विमान दिल्लकडे रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दिली आहे.

  • 26 Feb 2022 08:55 PM (IST)

    सर्वांची सुरक्षा करणं ही आपली प्राथमिकता : पियूष गोयल

    महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, हिमाचल अनेक राज्यातील विद्यार्थी आलेत

    – त्यांना पाहून आनंद वाटला

    – एअर फोर्ससह अनेक विभागातील अधिकाऱ्यांनी काम केले

    – पंतप्रधान मोदींचे आभार

    उद्या सकाळी दिल्लीत विमान पोहोचतय

    – सर्वांची सुरक्षा करणे हे भारताची प्रथमिकता

    – सर्व विद्यार्थी सुखरूप भारतात पोहोचतील

    – भाजप कार्यकर्त्यांकडून मोदी जिंदाबादची घोषणाबाजी


  • 26 Feb 2022 08:40 PM (IST)

    नागपूरचे 27 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले

    – युक्रेनमध्ये अडकेल्या 27 विद्यार्थ्यांच्या पालकांचा नागपूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क

    – काल पाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी साधला होता संपर्क

    – आज आणखी 22 विद्यार्थ्यांच्या पालकांनी साधला संपर्क

    – विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची पालकांची विनंती

  • 26 Feb 2022 08:12 PM (IST)

    युक्रेनवरून येणारं विमानं मुंबईत दाखल

    युक्रेनवरून येणारं विमानं मुंबईत दाखल

    छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल

    7 वाजून 55 मिनीटांनी विमान दाखल

  • 26 Feb 2022 07:50 PM (IST)

    यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी 219 विद्यार्थी काही वेळात मुंबई विमातळावर पोहोचणार

    – यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी 219 विद्यार्थी काही वेळात मुंबई विमातळावर पोहोचणार

    – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही मुंबई विमानतळावर पोहोचल्या

    – विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकही विमानतळावर दाखल

    – 5 दिवसांपूर्वीच मुंबईतील विद्यार्थिनी गेली होती युक्रेन

    – लक्ष्मी मिश्रा असे आपल्या मुलीला घेण्यासाठी आलेल्या पालकांचे नाव

    – साधारणपणे 8 ते 8:30 पर्यंत विद्यार्थी मुंबईत होणार दाखल

  • 26 Feb 2022 07:38 PM (IST)

    मुंबईत परतणाऱ्या भारतीयांचं पियूष गोयल स्वागत करणार

    यूक्रेनमधून सुखरुप परतणाऱ्या भारतीयांचं मुंबईतील विमातळावर स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित राहणार आहेत. सरकार आपल्या नागरिकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी मिशन मोडवर काम करत असल्याचं गोयल यांनी सांगितलंय.

  • 26 Feb 2022 07:27 PM (IST)

    भारताचे रोमानिया इथले राजदूत राहुल श्रीवास्तव भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात

    भारताचे रोमानिया इथले राजदूत राहुल श्रीवास्तव भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात

  • 26 Feb 2022 06:32 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्यात फोनवर चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्यात फोनवर चर्चा झालीय

    यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींची मदत मागितली

    यूएनमध्ये सहकार्य करण्याची मागणी

    रशिया कोणत्या भागात हल्ला करतंय याची माहिती दिली

    रशियाचं 1 लाख सैन्य आमच्या भूमीवर आहे

    भारतानं संयुक्त राष्टांच्या सुरक्षा परिषदेत  यूक्रेनचं समर्थन करावं, अशी मागणी झेलेनस्की यांनी केली आहे.

  • 26 Feb 2022 05:22 PM (IST)

    यूक्रेनची राजधानी कीव शहरात 5 वाजल्यानंतर कर्फ्यू लागणार

    यूक्रेनची राजधानी कीवमध्ये स्थानिक प्रमाण वेळेनुसार 5 वाजल्यानंतर कर्फ्यू लागू होईल. कीववर मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे.

  • 26 Feb 2022 05:06 PM (IST)

    Russia Ukraine Fast News | Russia – Ukraine संदर्भातील बातम्या | 26 February 2022

    Russia Ukraine Fast News | Russia – Ukraine संदर्भातील बातम्या | 26 February 2022

  • 26 Feb 2022 05:04 PM (IST)

    युक्रेनमधील विद्यार्थी लवकरच भारतात परतणार

    युक्रेनमधील विद्यार्थी लवकरच भारतात परतणार

    सागर तेलम या मराठी विद्यार्थ्याची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठी कडे

    अनेक विद्यार्थी सध्या रुमानिया बॉर्डरवर दाखल

    काही वेळातच विमान मुंबईकडे झेपावणार

  • 26 Feb 2022 04:44 PM (IST)

    यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की कीवमधून पळाले, रशियन माध्यमांचा दावा

    यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की कीवमधून पळून गेले असल्याचा दावा रशियन माध्यमांनी केलाय.

  • 26 Feb 2022 03:55 PM (IST)

    स्वीडननंतर फ्रान्सही यूक्रेनला संरक्षण सामग्री देणार

    स्वीडननंतर फ्रान्स आता यूक्रेनला संरक्षण सामग्री देणार आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी ट्विटकरुन फ्रान्सचे अध्यक्ष इम्यान्युअल मॅक्रॉन यांचं आभार मानले आहेत.

  • 26 Feb 2022 03:02 PM (IST)

    अमेरिका यूक्रेनला 26 अब्ज रुपये देणार

    अमेरिकेनं यूक्रेनला 26 अब्ज रुपये म्हणजे 350 मिलियन अमेरिकन डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन आक्रमणाला तोंड देण्यासाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

  • 26 Feb 2022 02:16 PM (IST)

    नेदरलँड यूक्रेनला 200 अँटी एअरक्राफ्ट मिसाईल देणार

    नेदरलँड यूक्रेनला 200 अँटी एअरक्राफ्ट मिसाईल देणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 26 Feb 2022 02:00 PM (IST)

    रशियाच्या हल्ल्यात बेचिराख झालेली कीवमधील एक इमारत 

  • 26 Feb 2022 01:09 PM (IST)

    ‘भारत आपल्या नागरिकांचे संरक्षक करण्यासाठी सक्षम’

    भारत युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सरकार या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद असल्याने, आम्ही जमिनीचा मार्ग वापरत आहोत. आम्ही इतर देशांच्या मदतीने आमच्या देशातील नागरिकांना युक्रेनबाहेर काढत आहोत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माहिती दिली असल्याचे राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे.

     

  • 26 Feb 2022 12:16 PM (IST)

    Russia Ukraine War, सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, काँग्रेसची मागणी

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. जगभरातून युक्रेनला समर्थन मिळताना दिसत आहे. रशियाने युक्रेनवर नाहक हल्ला केल्याचे सूर जगात उमटत आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर भारताने मतदान केल्याचे टाळले. दरम्यान आता यावरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. भारत जेव्हा संकटात होता तेव्हा रशिया भारताच्या पाठिशी उभा राहिला. रशिया हा भारताचा चांगला मित्र आहे. मात्र जेव्हा मित्र चुकतो तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवण्याची आपली जबाबदारी असते. त्यामुळे केंद्र सरकारला एक निर्णयाक भूमिका घ्यावी लागेल असे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

     

  • 26 Feb 2022 12:08 PM (IST)

    जॉर्जियामध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. जॉर्जियामध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत लाखो नागरिकांनी रशियाचा विरोध केला आहे. रशियाचा निषेध करण्यासाठी आज लाखो नागरिक रस्त्यावर उतरले.

  • 26 Feb 2022 11:31 AM (IST)

    रशियात फेसबूकवर बंदी

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र आता रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना स्वदेशातूनच विरोध होताना दिसून येत आहे. रशियन नागरिकांकडून युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी आंदोलने देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. रशियातील अनेक नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा विरोध करत असल्यामुळे रशियात आता फेसबूकवर बंदी घालण्यात आली आहे.

  • 26 Feb 2022 11:17 AM (IST)

    रामदास आठवले घेणार संभाजी महाराजांची भेट

    रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले आज शनिवार दि.26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात आयोजित मराठा आरक्षण आंदोलनाला भेट देणार आहेत.

  • 26 Feb 2022 11:02 AM (IST)

    भारताचे विमान रोमची राजधानी बुखारेस्टमध्ये पोहोचले

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना विशेष विमानाने भारतात आणण्यात येणार आहे. त्यांना आणण्यासाठी गेलेले एअर इंडियाचे विशेष विमान रोमची राजधानी बुखारेस्टमध्ये पोहोचले. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना रोम मार्गे भारतात आणण्यात येणार आहे.

     

  • 26 Feb 2022 10:42 AM (IST)

    युक्रेनमधून लाखो लोकांचे स्थलांतर

    यूएनच्या अंदाजानुसार युक्रेनमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत असून, आतापर्यंत तब्बल एक लाख नागरिकांनी आपले घर सोडून, सुरक्षीत जागी स्थलांतर केले आहे. तर हजारो नागरिकांनी देश सोडला आहे.

  • 26 Feb 2022 10:04 AM (IST)

    रशियाचे पाच फायटर विमाने पाडल्याचा युक्रेनचा दावा

    रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनच्या भूमित युद्ध सुरू आहे. याचदरम्यान हल्ल्याच्या तयारीत असलेले रशियाचे पाच फायटर विमाने पाडल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आला आहे.

  • 26 Feb 2022 09:10 AM (IST)

    नाटोने शद्ब पाळला, अमेरिकेच्या दोन बॉम्बर विमानाचे उड्डाण

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. मिळत असलेल्या माहितीनुसार आता या युद्धात अमेरिकेने उडी घेतली असून, रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्याला अमेरिका प्रत्युत्तर देणार आहे. यासाठी अमेरिकेचे दोन बॉम्बर विमान रशियाकडे झेपावले आहेत.ब्रिटिश एअरवेजमधून दोन अमेरिकन बॉम्बर विमानांनी उड्डाण केले आहे.

     

  • 26 Feb 2022 08:57 AM (IST)

    भारतीय दुतावासाकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी नव्या गाईडलाईन्स

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्याने अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. या नागरिकांना सातत्याने युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून सूचना देण्यात येत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आता दुतावासाकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. नव्या पत्रकानुसार सीमेवरील अधिकाऱ्यांना माहिती न देता कोणत्याही सीमेवर जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.

     

  • 26 Feb 2022 08:38 AM (IST)

    नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे युक्रेन सरकारचे आवाहन

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज युद्धाचा तिसरा दिवस आहे. या पार्श्वभू्मीवर घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन युक्रेन सरकारच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. बाहेर रस्त्यावर युद्ध चालू आहे. तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर पडू नका असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

  • 26 Feb 2022 08:34 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक रोम मार्गे भारतात परतताना

  • 26 Feb 2022 08:26 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक रोम मार्गे भारतात परतणार

    युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले होते. या नागरिकांना सुखरूप भारतामध्ये आणण्याचे मोठे आव्हान मोदी सरकारसमोर होतं, या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालय सातत्याने युक्रेन सरकारच्या संपर्कात होते. अखेर आज रोममधून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन दोन विमाने भारतामध्ये दाखल होणार आहेत.

  • 26 Feb 2022 07:03 AM (IST)

    युक्रेनच्या अर्थमंत्र्यांची जयशंकर यांच्याशी चर्चा

    रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या अर्थमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा केली. हे युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियाला आवाहन करावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली.